आगरकर मळा येथील आनंद नगर परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमीपूजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याचे कार्य सातत्याने सुरु आहे. आनंद नगर परिसरातील रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले असून, कामे करताना त्याचा दर्जा देखील चांगला राखला जात असल्याचे प्रतिपादन नगरसेवक अनिल शिंदे यांनी केले.
आगरकर मळा येथील आनंद नगर परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमीपूजन प्रसंगी नगरसेवक शिंदे बोलत होते. यावेळी विवेक वाव्हळ, उमेश शिंदे, आशिष (मुन्ना) शिंदे, कमल खोमणे, शामला साठे, संगीता सुपेकर, रंजना लोंढे, मंगल वाव्हळ, नीता पारखे, वैशाली शिंदे, सीमा कटारिया, पूजा चौधरी, निकिता शहा, मंगला चौधरी, शहा काका, दत्तात्रय जंगले, सुरज अकोलकर, ठाकूर परदेशी शैलेश मेहेर, आशिष मेहेर, वैजनाथ लोखंडे, बाळू परदेशी, गोरख पवार, नाना पार्सेकर, पराग शहा, शर्मा, राहुल संतवन, किसन घुले, संदीप खोटे, बाळासाहेब ठुबेकर, विशाल नागले, विशाल शिंदे, राजेश वाव्हळ, तेजस पारखे, डॉ. पवार, जोशी काका, नमन शहा, राजेश वाव्हळ, जंगले, विवेक वाव्हळ, सुरज अकोलकर आदी उपस्थित होते.

पुढे नगरसेवक शिंदे म्हणाले की, प्रभागात विकास कामांसह प्रलंबीत प्रश्न सोडविण्यात येत आहे. आगरकर मळा भागात फेज टू चे काम पूर्ण झालेले आहे. या योजनेला महापालिकेचा निधी असल्याने ठेकेदार काम करण्यास तयार होत नाही. उन्हाळ्यात या भागात पाणी प्रश्न गंभीर बनतो. फेज टू ची लाईन येथील नागरिकांना स्वखर्चाने जोडून दिली जाणार असून, त्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांनी नवरात्रीच्या प्रारंभाला रस्त्याचा प्रश्न सुटत असल्याने जणू देवी पावल्याचा आनंद होत आहे. महिला वर्गाला नवरात्रीची भेटच मिळणार असल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त करुन नगरसेवक शिंदे यांचे प्रलंबीत रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आभार मानले.
