• Tue. Jul 22nd, 2025

केडगावच्या शास्त्रीनगर पावन हनुमान मंदिर येथे सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन

ByMirror

Feb 17, 2024

विकासात्मक कामे करायची म्हंटले तर काही कटू निर्णय घ्यावे लागतात -सचिन (आबा) कोतकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाच्या दृष्टीने विकासात्मक कामे करायची म्हंटले तर काही कटू निर्णय घ्यावे लागतात. मात्र विरोधक त्याला दादागिरीची भाषा संबोधतात. केडगाव मधील प्रलंबित विकास कामे मार्गी लावली जाणार आहे. राहिलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पुन्हा नव्या जोमाने कार्य सुरु असल्याचे प्रतिपादन उद्योजक सचिन (आबा) कोतकर यांनी केले.


केडगाव येथील शास्त्रीनगर पावन हनुमान मंदिर येथे नगरसेविका गौरीताई ननावरे यांच्या पाठपुराव्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून मंजूर झालेल्या सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन उद्योजक सचिन (आबा) कोतकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी इंजि. प्रसाद आंधळे, नगरसेविका गौरीताई ननावरे, नगरसेवक मनोज कोतकर, राहुल कांबळे, सुरज शेळके, सामाजिक कार्यकर्ते गणेश ननावरे, जालिंदर कोतकर, भूषण गुंड, अशोक कराळे, पोपट कराळे, बाबाशेठ कोतकर, श्‍याम कोतकर, सुमित लोंढे, शिवाजी पळसकर, राजूशेठ पितळे, सांगळे, हिरामन धजाळ, पवार, जमदाडे दाजी, सुधाकर गोरे, सुळ काका, आदम शेख, अकबर पठाण, अजिज सय्यद, गंगाधर कारंडे, तांबे काका, सचिन प्रभुणे, तरटे, सागरमल प्रार्चे, शंकरराव ननावरे, आनंद फुलझळके, सुनील बोरुडे, अजित कोतकर, अण्णासाहेब शिंदे, नवनाथ मासाळ, नंदू वाव्हळ, बाबूराव लोखंडे, काळे, शेषराव कारखिले आदींसह परिसरातील नागरिक व केडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे कोतकर म्हणाले की, प्रभाग 17 मध्ये मोठ्या प्रमाणात सात ते आठ कोटी रुपयांची विकास कामे झाली. इतर परिसरातील प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने कार्य सुरु आहे. कामाचे श्रेय कोणीही घेतले तरी चालेल, मात्र विकास कामात अडथळे कोणीही आणू नये. सर्वसामान्य नागरिकांचा त्रास हाल-अपेष्टा कमी व्हावे हाच एक प्रमाणिक हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर हिंदू धर्मासाठी मंदिर बांधणे हातभार लावणे सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगून मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी सर्वांनी हातभार लावण्याचे आवाहन करुन त्यांनी मंदिरासाठी 21 हजार रुपयाची मदत जाहीर केली.


इंजि. प्रसाद आंधळे म्हणाले की, केडगावात तब्बल 11 सभा मंडप उद्योजक सचिन (आबा) कोतकर यांच्या शब्दामुळे मंजूर झाले आहेत. केडगावात मंदिर व शाळांची पायाभरणीचे काम भानुदास कोतकर यांनी केले. भावी पिढी संस्कारी व ज्ञानी होवून समाजाचा विकास साधला जावा या दृष्टीकोनाने त्यांनी काम केले. कोतकर स्टाईल आंदोलनाने केडगाव पाणी योजना पूर्ण झाली. संदीप कोतकर महापौर असताना त्यांनी सावेडी पासून ते केडगाव पर्यंत अनेक विकास कामे व रस्त्यांची कामे मार्गी लावली. संदीप कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली केडगावच्या अंगणवाडी व रेल्वे भुयारी मार्गाचा प्रश्‍न देखील मार्गी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


गौरीताई ननावरे यांनी प्रभागातील विकास कामे मार्गी लावून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम सातत्याने सुरु असल्याचे स्पष्ट केले. मनोज कोतकर यांनी खासदार निधीतून सभा मंडपाचे काम मार्गी लावण्यात आले आहे. केडगावमध्ये विकास कामे सुरू आहे. अंगणवाडीसाठी देखील पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रारंभी हनुमान मंदिरात उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीत विधीवत पूजनाने सभा मंडपाच्या कामाला प्रारंभ करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पळसकर यांनी केले. आभार गणेश ननावरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *