• Wed. Jul 2nd, 2025

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा बारावी बोर्डाचा शंभर टक्के निकाल

ByMirror

May 6, 2025

वैष्णवी मेहेत्रे व आर्यन बोरा शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या बारावी बोर्डाच्या (एचएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा सायन्स व कॉमर्स दोन्ही विभागांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. यावर्षी देखील संख्यात्मक व गुणात्मक निकाल सर्वोत्कृष्ट लागला आहे.


वैष्णवी प्रशांत मेहेत्रे हिने 91.50% गुण मिळवून सायन्स विभागात विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर आर्यन कैलास बोरा याने 95.67% गुण मिळवून कॉमर्स विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच आर्यन कैलास बोरा, प्रेम आनंद कोठारी, पार्थ मंगेश चंगेडिया, स्मित संतोष गुगळे या विद्यार्थ्यांनी बुक कीपिंग ॲण्ड अकाउंटन्सी या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. त्याचप्रमाणे गणित व आयटी विषयांमध्ये आर्यन कैलास बोरा याने शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहेत.


सर्व यशस्वी विद्यार्थी तसेच गुणांनुक्रमे विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अभय फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाहक गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे सर्व विश्‍वस्त, सल्लागार मंडळाचे सदस्य तसेच विद्यालयाचे प्राचार्य उल्हास दुगड, उपमुख्याध्यापक पोपट पवार, पर्यवेक्षक बाळू वाव्हळ, विष्णु गिरी, कैलास साबळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *