• Thu. Oct 30th, 2025

भाई सथ्था रात्र शाळा ठरली राज्यात द्वितीय

ByMirror

Sep 4, 2023

मासूम संस्थेच्या वतीने शाळेला करंडक देवून गौरव

शाळेचे तीन विद्यार्थी रात्र शाळेच्या राज्य गुणवत्ता यादीत

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील रात्र शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेशित करून इयत्ता 10 वी बोर्डाचा उत्तम निकाल लागलेल्या हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था रात्र शाळेला मुंबई येथील मासूम संस्थेने द्वितीय क्रमांकाचा करंडक प्रदान केला. रात्र शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा पुरवून त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या मासूम संस्थेने संपूर्ण राज्यातील रात्र शाळेचे मूल्यांकन केले होते.


मासूम संस्थेच्या वतीने वार्षिक पारितोषिक वितरण शहरातील महर्षी ग.ज. चितांबर शाळेत आयोजित करण्यात आले होते. याकार्यक्रमप्रसंगी मासूम संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक गुरुप्रसाद पाटील, वरिष्ठ कार्यक्रम प्रमुख कमलाकर माने, कार्यक्रम प्रमुख संदीप सुर्यवंशी, भाई सथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ. पारस कोठारी व नवविद्या प्रसारक मंडळाचे मानद सहसचिव चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी भाई सथ्था रात्र शाळेचे प्राचार्य सुनिल सुसरे, भिंगार नाईट हायस्कूलच्या मुख्याध्यापिका विजया वाळुंजकर, सरस्वती नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक पांडुरंग गवळी आदींसह विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


भाई सथ्था नाईट हायस्कूलने शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये रात्र शाळेत प्रवेश, निकाल व इयत्ता दहावी मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेशित करून 79 विद्यार्थीनी प्राविण्य मिळवल्याबद्दल मासूम संस्थेने केलेल्या मूल्यांकनात अहमदनगरची भाई सथ्था रात्रशाळा राज्यात दुसरी ठरली. तर राज्यातून मासूम संस्थेच्या वतीने रात्रशाळेतील दहा विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. यामध्ये देखील भाई सथ्थाच्या तीन विद्यार्थींनीनी पहिल्या दहा मध्ये येण्याचा बहुमान मिळविला आहे. यामध्ये स्वाती प्रभाकर दुनगू (चौथा क्रमांक), अंबिका नारायण मडूर (सहावा क्रमांक) व रेणुका अशोक उमाप (नववा क्रमांक) विद्यार्थीनीचा या कार्यक्रमात करंडक देऊन सन्मान करण्यात आला.


रात्रशाळेचे प्राचार्य सुनिल सुसरे,गजेंद्र गाडगीळ, महादेव राऊत, अमोल कदम, शिवप्रसाद शिंदे, बाळू गोर्डे, मंगेश भुते, अशोक शिंदे, शरद पवार,अविनाश गवळी, कैलास करांडे, प्रशांत शिंदे, अनिरुध्द देशमुख ,मनोज कोडेंजकर,अनिरुद्ध कुलकर्णी, संदीप कुलकर्णी कैलास बालटे आदींसह विद्यार्थी यांनी द्वितीय क्रमांकाचा करंडक पाहुण्यांच्या हस्ते स्विकारले.


भाई सथ्था नाईट हायस्कूलला राज्यातून द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर, एस.एस.सी प्रमुख शशिकांत गवस, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, कार्याध्यक्ष ॲड अनंत फडणीस, मानद सचिव संजय जोशी, जेष्ठ मार्गदर्शक ब्रिजलालजी सारडा, अजित बोरा आदी संचालकांनी रात्रशाळेच्या सर्व यशस्वी विद्यार्थी, रात्रशाळेचे चेअरमन, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *