पतसंस्थेच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी बाळासाहेब खताडे यांची नियुक्ती करण्यात आली. टिळक रोड येथील पतसंस्थेच्या कार्यालयात खताडे यांचा संस्थेचे चेअरमन सुदाम मडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वैभव चव्हाण, जिल्हा मराठा पतसंस्थेचे संचालक बाळकृष्ण काळे, लक्ष्मण सोनाळे, कैलास आहेर, विकास भालेराव, लेखापरीक्षक आर.एल. शिंदे, एस.बी सोनवणे, आनंद क्षीरसागर, सुरज डोके आदी उपस्थित होते.
संस्थेचे चेअरमन सुदाम मडके म्हणाले की, सभासद हिताचा विचार करुन व संस्थेच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीकोनाने नगर तालुका नागरी सहकारी पतसंस्थेची वाटचाल सुरु आहे. सभासद व त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याचा विचार करून अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. गरजेच्या वेळी सभासदांना कमीत कमी व्याज दराने तत्काळ वित्त पुरवठा करण्याचे काम सुरु आहे. खताडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बाळकृष्ण काळे यांनी नगर तालुका नागरी सहकारी पतसंस्थेच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक करुन खताडे यांना शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब खताडे यांनी संस्थेचे कामकाज अधिकाधिक कार्यक्षम, पारदर्शक व सभासदाभिमुख होण्यासाठी व संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी प्रयत्नशील राहून कार्य करणार असल्याची ग्वाही दिली.
या निवडीबद्दल पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन वसंत लोढा, भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, भाजपचे सरचिटणीस महेश नामदे, राजेंद्र औटी, संजय वल्लाकटी, नितीन फुटाणे, पवन बोगावत आदींनी खताडे यांचे अभिनंदन केले.