शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख पोपटराव पाथरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
शिष्टमंडळ जाणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
अहमदनगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीत शहर मतदारसंघासाठी शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याची मागणी शिवसेना दलित आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे पत्र शिवसेना दलित आघाडीचे दक्षिण जिल्हा प्रमुख पोपटराव पाथरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले असून, लवकरच शिष्टमंडळ या मागणीसाठी मुंबईला मुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी जाणार आहे.
बाबुशेठ टायरवाले 1984 ते 85 सालापासून शिवसेनेत सक्रीय आहे. सर्जेपुरा भागामध्ये शाखाप्रमुख ते सध्या दक्षिण जिल्हाप्रमुख पदा पर्यंत त्यांनी काम पाहिले असून, शिवसेनेचे एकनिष्ठ पदाधिकारी म्हणून त्यांनी जिल्ह्यात आपली ओळख निर्माण केली आहे. शिवसेनेत काम करताना त्यांनी अनेक गोरगरिबांचे कामे केली असून, शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी त्यांचे जिल्ह्यात मोठे योगदान आहे. पक्षाने त्यांच्याकडे दक्षिण जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविलेली असून, पदाच्या माध्यमातून त्यांनी एमआयडीसी सारख्या कंपन्यांमध्ये अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून दिला आहे. राजकारणात राहून सामाजिक कार्य करताना त्यांचा मोठा जनसंपर्क असून, त्यांनी एक ते दोन लाखापर्यंत शिवसैनिकांची सभासद नोंदणी केलेली आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी शहरातील विविध प्रश्न व अनेक गोरगरिबांचे कामे मार्गी लावली असल्याचे पत्रात नमुद करण्यात आले आहे.
बाबुशेठ टायरवाले यांनी केलेले कार्य व पक्षातील त्यांचे योगदान पाहून त्यांना अहमदनगर शहर विधानसभेसाठी उमेदवारी देण्याची मागणी दलित आघाडीचे दक्षिण जिल्हा प्रमुख पोपटराव पाथरे यांनी केली आहे. टायरवाले यांना उमेदवारी मिळण्यासाठी शिवसेना दलित आघाडीचे शाखाप्रमुख पांडुरंग घोरपडे, अशोक सोनवणे, संजय घोरपडे, हरिश्चंद्र खरात, भाऊ बुलाखे, सागर घोरपडे, अनिल वैरागर, किशोर पटेकर, अमर रोकडे, सुदाम वैराळ, सनी घोरपडे, गणेश पाथरे, संदीप ससाणे, संजय ससाणे, विक्रम गायकवाड, विजय पाथरे, सर्जेपुरा भागातील कार्यकर्ते सुनील भोसले, विशाल वाघमारे, ज्ञानदेव वागचौरे, नंदू पाचारणे, बाळू अडागळे, सुनिता बहुले, नंदा पाथरे, पुष्पा भोसले, लताबाई घोरपडे, मीनाताई नेटके, वैशाली पटेकर, छायाबाई घोरपडे, मायाताई खरात, दुर्गा घोरपडे आदी प्रयत्नशील आहेत.