आरक्षण न देणाऱ्या सरकारचा निषेध
अन्यथा समाज पेटून उठणार -तान्हाजी परभाणे
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बाबुर्डी घुमट (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरु करुन मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. गावातील हनुमान मंदिरात सुरु असलेल्या उपोषणाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या उपोषणात सरपंच नमिता राहुल पंचमुख, उपसरपंच तान्हाजी परभाणे, बाबासाहेब परभाणे, भाऊसाहेब चव्हाण, सोनू मुंजाळ, संतोष चव्हाण, संजय गुंड, राहुल पंचमुख, संदीप परभाणे, गणेश परभाणे, महेश परभाणे, राजू परभाणे, विजू चव्हाण, गणेश चव्हाण, अनिल खेगात, एकनाथ गवळी, प्रवीण परभाणे, पवन पंचमुख, शरद भगत, राजू भगत, सचिन भगत, धर्मनाथ माने, संदीप काळे, बाळासाहेब परभाणे, सुपेकर, संदीप पंचमुख, अंकुश परभाणे, प्रकाश मोरे, विकास परभाणे, बबन फसले, भीमसेन कोतकर, बापू कोतकर, विनायक माने, प्रकाश भगत, पवन लांडगे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रारंभी मंदिरात आरती करुन व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन उपोषणाला प्रारंभ करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करुन एक मराठा लाख मराठा… घोषणांनी गाव परिसर दणाणून निघाला. मराठा समाजाला आरक्षण न देणाऱ्या सरकारचा निषेध नोंदवून मराठा समाजाला तातडीने आरक्षण देऊन सर्व मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात आली.
उपसरपंच तान्हाजी परभाणे म्हणाले की, मराठा आरक्षणाचा संघर्ष मागील चार दशकांपेक्षा अधिक काळापासून सुरू आहे. मराठा समाजाची बिकट अवस्था असून, समाज हा न्याय, हक्काचे आरक्षण मागत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वच राजकीय पक्षांनी सामंजस्यांची भूमिका घेतली असती, तर समाजातील संतापाचा उद्रेक झाला नसता. आजही समाज लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास समाज पेटून उठणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. उपस्थितांनी देखील आरक्षणा संदर्भात तीव्र भावना व्यक्त करुन सर्वच राजकीय पक्षांचा निषेध व्यक्त केला.