• Thu. Feb 6th, 2025

शहरात वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती

ByMirror

Jan 30, 2025

पोलीस अधिकारी, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, महाविद्यालयाचे युवक-युवती उतरले रस्त्यावर

अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन

नगर (प्रतिनिधी)- शहर वाहतूक शाखा, नेहरू युवा केंद्र, उमेद सोशल फाऊंडेशन व प्रगत कला महाविद्यालयाच्या वतीने शहरात वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. डीएसपी चौकातील सिग्नलवर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांना अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले.
सडक सुरक्षा सप्ताहानिमित्त शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. पोलीस अधिकारी, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, महाविद्यालयाचे युवक-युवतींनी रस्त्यावर उतरुन नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची जाणीव करुन देण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड, कॉन्स्टेबल खलाटे, पोलीस नाईक साठे, जय असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, प्रगतकला महविद्यालयाचे प्राचार्य महावीर सोनटक्के, नुरील भोसले, दिनेश अष्टेकर, चंद्रकांत देठे, उमेद सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, सचिव सचिन साळवी, विजय लोंढे, रवी साखरे, ॲड. दिपक धीवर, माहेर फाऊंडेशनच्या रजनीताई ताठे आदींसह प्रगत कला महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.


ॲड. महेश शिंदे म्हणाले की, स्वत:च्या सुरक्षिततेसह इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्‍यक आहे. अपघातात एखादा कर्ता पुरुष दगावल्यास तो संसार उघड्यावर येतो. कुटुंबीयांच्या जबाबदारीचे भान ठेवून प्रत्येकाने अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करुन, त्यांनी वाहतुकीच्या नियमाबाबत माहिती दिली.
अनिल साळवे म्हणाले की, अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम आहेत. सदर नियमाचे पालन करुन अपघाताचे प्रमाण कमी करता येणार आहे. अपघातांची दिवसंदिवस वाढत्या संख्येला वाहतुकीच्या नियमांमध्ये केलेला निष्काळजीपणा आहे. एखादाअपघात झाल्यानंतर घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी जीवनदूतची भूमिका पार पाडावी. जखमींचा जीव वाचविण्यासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्याबाबत त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमास नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे, उमेद सोशल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष कुणाल तनपुरे, खजिनदार संजय निर्मळ यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *