प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक दिनानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका हिना वाजिद शेख यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक व माजी प्राचार्य खासेराव शितोळे यांच्या हस्ते शेख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

टिळकरोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी जुबेर पठाण, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, संयोजन समितीचे प्रा. माणिक विधाते, ज्ञानदेव पांडुळे आदी उपस्थित होते.

हिना शेख यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष शाहीद काझी, सचिव रेहान काझी, संचालिका डॉ. अस्मा शाहिद काझी, प्राथमिकचे मुख्याध्यापक समीउल्ला शेख, माध्यमिकचे मुख्याध्यापक एजाज शेख आदींनी अभिनंदन केले.