ओम लोखंडे व सिध्दार्थ तवकडे यांचे गोल ठरले विजयासाठी निर्णायक
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि.25 सप्टेंबर) झालेल्या मुलांच्या सामन्यात 14 व 12 वर्ष वयोगटात अनुक्रमे आठरे पाटील स्कूल व आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस) संघ विजयी झाले.
14 वर्ष वयोगटात आठरे पाटील स्कूल विरुध्द तक्षिला यांच्यात सामना रंगला होता. यामध्ये आठरे पाटील संघाकडून ओम लोखंडे याने तब्बल 3 गोल करुन विजश्री खेचून आणली. तर त्याला साथ देत अशोक चंद याने 1 गोल केला. प्रतिस्पर्धी संघाकडून एकही गोल करण्यात आला नाही. 4-0 गोलने आठरे पाटील स्कूलचा संघ विजयी झाला.

12 वर्ष वयोगटात आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस) विरुध्द आर्मी पब्लिक स्कूल (एमआयसी ॲण्ड एस) यांच्यात रंगतदार सामना पहावयास मिळाला. पहिल्या हाफ मध्ये दोन्ही संघाकडून आक्रमक खेळी करुन एकही गोल झाला नाही. सेकंड हाफ मध्ये आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस) संघाकडून सिध्दार्थ तवकडे याने 1 गोल करुन विजय निश्चित केला. 1-0 गोलने आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस) संघ विजयी झाला.
स्पर्धेचे पंच म्हणून सलमान शेख, सुमितसिंग राठोड, जोनाथन जोसेफ, रितिका छजलानी, प्रियंका आवारे, जेरेमी म्हार, क्लेमेंट म्हार, सोनिया दोसानी यांनी काम पाहिले. स्पर्धेचे सामनाधिकारी म्हणून जेव्हिअर स्वामी उपस्थित होते.