• Thu. Jan 22nd, 2026

नगरच्या अथर्व वाळके याने अमेरिकेत मिळवली कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट ॲण्ड् टेक्नॉलॉजीची पदवी

ByMirror

Dec 25, 2024

ए.एस.यू. विद्यापीठात गौरव

नगर (प्रतिनिधी)- शहरातील अथर्व सतीश वाळके या युवकाने अमेरिका येथील ए.एस.यू. विद्यापीठात कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट ॲण्ड् टेक्नॉलॉजीची पदवी मिळवली. त्याचा विद्यापिठाच्या वतीने गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला.
अथर्व वाळके हे टांगे गल्ली येथील सतीश विष्णुपंत वाळके यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलला शिक्षण घेऊन कन्स्ट्रक्शन विषयात भारती विद्यापिठात डिप्लोमा तर पुणे येथील अनंतराव पवार महाविद्यालयात डिग्री घेतली होती. त्यानंतर अमेरिका येथील ए.एस.यू. विद्यापिठात दोन वर्षाच्या कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट ॲण्ड् टेक्नोलॉजीची पदवीसाठी प्रवेश मिळवला होता. नुकतेच त्यांनी यशस्वीरित्या पदवी मिळवली असून, त्याची अमेरिकेतील एका नामांकित कंपनीमध्ये निवड देखील झाली आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *