फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा
गुरुवार पासून रंगणार 17 वर्षाखालील मुलींचे सामने
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी (दि.24 सप्टेंबर) फुटबॉलचे थरारक सामने पार पडले. 12, 14 व 16 वर्ष वयोगटात सुरु असलेल्या या स्पर्धेत आठरे पाटील, प्रवरा पब्लिक, आर्मी स्कूलच्या संघाने गुणांची कमाई करुन आघाडी घेतली आहे. तर गुरुवार पासून 17 वर्षा खालील मुलींच्या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
मंगळवारी 14 वर्ष वयोगटात झालेल्या ऊर्जा गुरुकुल विरुध्द आर्मी पब्लिक स्कूल (एपीस) यांच्यात झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलचे खेळाडू आदर्श साबळे व प्रतिक शेळके यांनी प्रत्येकी 1 गोल केले. या सामन्यात 0-2 गोलने आर्मी पब्लिक स्कूलचा संघ विजयी झाला.
श्री साई स्कूल विरुध्द तक्षिला यांच्यात झालेल्या सामन्यात तक्षिला स्कूलच्या खेळाडूंनी सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रम खेळी करुन एकापाठोपाठ 5 गोल केले. यामध्ये गौरव याने 2, तर प्रितम देव, राजवीर, चिरायू यांनी प्रत्येकी 1 गोल केला. 0-5 गोलने तक्षिला स्कूलच्या संघाने दणदणीत विजय मिळवला.

आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुध्द अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात आठरे पाटील स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. आठरे पाटीलचे इंद्रजीत गायकवाड व अशोक चांद या खेळाडूंनी दमदार खेळी करुन प्रत्येकी 3 गोल करुन विजय निश्चित केला. तर पवन कानडे, ओम लोखंडे, आदित्य सिंग यांनी प्रत्येकी 1 गोल केला. 9-0 गोलने आठरे पाटील पब्लिक स्कूलने एकतर्फी विजय मिळवला.
डॉन बॉस्को विरुध्द सक्रेडहार्ट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात सक्रेडहार्ट कॉन्व्हेंटच्या संघाने तब्बल 9 गोल करुन 0-9 गोलने एकतर्फी विजय मिळवला. सक्रेडहार्ट कॉन्व्हेंट कडून जोएल साठा याने 4 तर मिहीर, असद तांबोळी, अंशुमन विधाते, फुरकान शेख, दर्शन या खेळाडूंनी प्रत्येकी 1 गोल केला.
16 वर्ष वयोगटात झालेल्या डॉन बॉस्को विरुध्द श्री साई स्कूलच्या सामन्यात डॉन बॉस्को संघाने 3 गोल करुन 3-0 गोलने विजय मिळवला. प्रतिक जाधव याने 1 व वेदांत कस्तोरिया याने 2 गोल केले.

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेतील संघांची गुणांकन नुसार असलेली आघाडी पुढील प्रमाणे:-
12 वर्ष वगोगट अ ग्रुप- प्रवरा पब्लिक स्कूल (9), आर्मी स्कूल (3),
ब ग्रुप- आठरे पाटील (6), तक्षिला (3).
14 वर्ष वयोगट अ ग्रुप- आठरे पाटील (6 गोलनुसार आघाडी), सक्रेडहार्ट कॉन्व्हेंट (3),
ब ग्रुप- आर्मी स्कूल (9), सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट (3).
16 वर्ष वयोगट अ ग्रुप- आर्मी स्कूल (6), ओऍसीस (0),
ब ग्रुप- आठरे पाटील (6), अशोकभाऊ फिरोदिया (7).
गुरुवार पासून रंगणार 17 वर्षाखालील मुलींच्या संघाचे सामने
मुलींच्या 6 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. हे सामने लीग पध्दतीने खेळविण्यात येणार आहे. 15 सामने रंगणार असून, मुलींच्या संघात आर्मी स्कूल, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट, आठरे पाटील, कर्नल परब, श्री साई व ओऍसीस स्कूलच्या संघाचा समावेश आहे.
