सहा दिवस युवक-युवतींसह ग्रामस्थांना दिले जाणार तणावमुक्त जीवनाचे धडे
नगर (प्रतिनिधी)- तणावमुक्त व आनंदी जीवन जगण्यासाठी नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने तर स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या सहकार्याने आनंद अनुभूती या सहा दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे प्रारंभ गुरुवारी दि.29 मे रोजी होणार असून, यामध्ये पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक रामचंद्र लोखंडे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे व विशाल गावडे यांनी केले आहे.
गुरुवार पासून गावातील नवनाथ मंदिराच्या सभा मंडपात संध्याकाळी 5:30 ते 8:30 वाजे पर्यंन्त हे शिबीर होणार आहे. यामध्ये योग, प्राणायाम, सुदर्शन क्रीया व ध्यानबाबत प्रशिक्षण देऊन आयुष्यातील ताण, तणाव मुक्तीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. तर मानसिक व अध्यात्मसंदर्भात तज्ञ मंडळी यांचे व्याख्यान होणार आहेत. वयोवर्षे 18 पुढील युवक-युवतींसह सर्व ग्रामस्थांना या प्रशिक्षण शिबीरात सहभागी होता येणार असून, याचा समारोप मंगळवारी दि.03 जून रोजी होणार आहे. शिबीरात सहभागी होण्यासाठी रामचंद्र लोखंडे 9130139600, पै.नाना डोंगरे 9226735346, विशाल गावडे 9403318705 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.