• Sun. Jul 20th, 2025

कर्नल परब स्कूलमध्ये रंगला विद्यार्थ्यांचा कला आणि हस्तकला प्रदर्शन

ByMirror

Feb 4, 2024

विद्यार्थ्यांनी साकारले उत्कृष्ट कलाकृतीचे नमुने

मोबाईलच्या युगात अडकलेल्या मुलांच्या सर्जनशीलतेला कलेतून प्रोत्साहन देण्याची गरज -अर्पिता रणवरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी कर्नल परब स्कूलमध्ये कला आणि हस्तकला प्रदर्शन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून त्यांनी तयार केलेल्या कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या पतंगावर आकर्षक कलाकृती, विविध हस्तकौशल्याच्या वस्तू, व्यक्तीचित्र, निसर्ग चित्रांचा समावेश होता. विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कलाकृती पाहून पाहुण्यांसह पालक देखील अवाक झाले.


या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सिटी हॉल, सर्कस, इसरो, हवा महल, थ्रेड आर्ट, पेन्सिल स्केच, वॉटर कलर स्केच, बटन आर्टचे प्रकल्प प्रदर्शनात मांडले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी कर्नल परब स्कूलच्या सीईओ गीता परब, संचालक कर्नल दिलीप परब, रिकी राज परब, मुख्याध्यापिका अर्पिता रणवरे, सनबीम्स प्री-प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका भावना शिंगवी आदींसह कर्नल परब व सनबीम्सच्या सर्व शिक्षका उपस्थित होत्या.


सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनात मांडलेल्या कलाकृती पाहण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. मुख्याध्यापिका अर्पिता रणनवरे म्हणाल्या की, मोबाईलच्या युगात अडकलेल्या मुलांच्या सर्जनशीलतेला कलेतून प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

कला आविष्कारातून समाधानाची जाणीव निर्माण होत असते. प्रत्येक विद्यार्थीमध्ये वेगवेगळी क्षमता असून, ती ओळखून त्या दिशेने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी कला आणि हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *