अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते उमेश धोंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्योग व व्यापार सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नुकतीच राष्ट्रवादीच्या नुतन पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या हस्ते धोंडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे आदी उपस्थित होते.
उमेश धोंडे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीत कार्यरत आहे. त्यांनी यापूर्वी सरचिटणीस पदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे. व्यापारी वर्गात धोंडे यांचा असलेला दांडगा जनसंपर्क व कार्य करण्याची तळमळ पाहून त्यांना उद्योग व व्यापार सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
उमेश धोंडे यांनी विकासात्मक व्हिजनने शहरात उद्योग व व्यापाराला चालना देण्यासाठी व उद्योजक, व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून कार्य केले जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. धोंडे यांच्या निवडीबद्दल प्रा. माणिक विधाते, वैभव ढाकणे, धिरज उकिर्डे, युवराज शिंदे, सुमित कुलकर्णी, अमित खामकर, महेंद्र माखिजा, मारुती पवार, धिरज पंड्या, परेश घुगरे यांनी अभिनंदन करुन पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.