• Sun. Jul 20th, 2025

नरेंद्र मोदी ॲपच्या संयोजकपदी सविता कोटा व सहसंयोजकपदी गोपाल वर्मा यांची नियुक्ती

ByMirror

Dec 26, 2023

सर्वसामान्य नागरिक या ॲपच्या माध्यमातून थेट पंतप्रधानांशी जोडला जाणार -सविता कोटा

अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपच्या शहर जिल्हा सरचिटणीस सविता कोटा यांची नरेंद्र मोदी (नमो) ॲपच्या संयोजकपदी तर गोपाल वर्मा यांची सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली. या ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती मिळणार आहे. तर थेट नागरिक पंतप्रधानांशी ॲपद्वारे संपर्क करुन प्रश्‍न मांडू शकणार आहे.


या नियुक्तीबद्दल महाप्रदेश सचिव नवनाथ पडळकर यांनी कोटा व वर्मा यांचा सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी दक्षिण लोकसभा निवडणुक समन्वयक भानुदास बेरड, लोकसभा निवडणुक प्रमुख माजी महापौर बाबासाहेब वाकळे, विधानसभा निवडणुक प्रमुख नगरसेवक महेंद्र (भैय्या) गंधे, भाजपा उपाध्यक्षा संध्या पावसे, भाजपा सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथा, महेश नामादे, महीला मोर्चाच्या रेखाताई मैड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


सविता कोटा यांनी सर्वसामान्य नागरिक या ॲपच्या माध्यमातून थेट पंतप्रधानांशी जोडला जाणार आहे. केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती सर्वांना घरबसल्या नमो ॲप द्वारे मिळणार आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रशासन व जनता जोडली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. तर या ॲपच्या माहितीचा प्रचार-प्रसार केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निवडीबद्दल कोटा व वर्मा यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *