• Mon. Jul 21st, 2025

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या प्रदेशाध्यक्षपदी रघुनाथ आंबेडकर यांची नियुक्ती

ByMirror

Feb 21, 2024

अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या प्रदेशाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी आंबेडकर यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.


भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या राज्य कार्यकारिणीची बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी आंबेडकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. याप्रसंगी राज्य कार्याध्यक्ष प्रकाश घोळवे, राज्य उपाध्यक्ष काशिनाथ पाचंगे, राज्य कार्याध्यक्ष संजय पाचुंदकर, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष उमेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे, प्रकाश थोरात, बाबासाहेब महापुरे, रीयाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब डोळस, महिला जिल्हाध्यक्षा अलकाताई झरेकर, जिल्हा संपर्कप्रमुख प्रेरणा धेंडे, दीपक साळवे, अमोल झेंडे, संदीप चव्हाण, अनिल पठारे, दिपक दिवटे, जगदीश आंबेडकर, डॉ. अभिजीत रोहोकले, शांताबाई आंबेडकर, एकनाथ राऊत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


रघुनाथ आंबेडकर गेली अनेक वर्ष सामाजिक चळवळीत कार्यरत आहे. वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अन्याय अत्याचार विरोधात ते सक्रीय आहेत. संघटनेचे त्यांनी पश्‍चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. उत्तमपणे सुरु असलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रदेशाध्यक्षपदी काम करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची भावना संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी व्यक्त केली.


रघुनाथ आंबेडकर यांनी मान्यता प्राप्त या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात कार्य सुरु आहे. दुर्बल घटकांचे प्रश्‍न सोडवून त्यांना न्याय देण्याचे काम केले जाणार आहे. तर व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *