कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने सत्कार
प्रामाणिकपणे केलेल्या कामाची दखल घेतली जाते -के.के. जाधव
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भगवान निकम व अशोक पंडित यांची वरिष्ठ सहाय्यक (लेखा) अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याबद्दल कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष के.के. जाधव यांनी निकम व पंडित यांचा सत्कार केला. यावेळी प्रमोद देशमुख, गणेश दिक्षीत, अर्चना रासकर मॅडम, विजय थोरात, सोमनाथ रोहकले, शरद साळुंके आदी उपस्थित होते.
के.के. जाधव म्हणाले की, कर्मचारी व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामाची दखल घेतली जाते. भगवान निकम व अशोक पंडित यांनी कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाची जबाबदारी प्रामाणिक व उत्तमपणे पार पाडली. मिळालेली पदोन्नती ही त्यांनी केलेल्या कामाची पावती असल्याचे त्यांनी सांगितले.
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदावरून पदोन्नती झालेले निकम यांची जिल्हा परिषद अर्थ विभागात तर पंडित यांची आरोग्य विभागात नेमणुक करण्यात आली आहे. नियुक्तीबद्दल उपस्थितांनी त्यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. पदोन्नती मिळाल्याबद्दल निकम व पंडित यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.