अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी अभिजीत सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली. नुकतीच राष्ट्रवादीच्या नुतन पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या हस्ते सपकाळ यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ आदी उपस्थित होते.

अभिजीत सपकाळ मागील आठ ते दहा वर्षापासून राष्ट्रवादी पक्षात कार्यरत आहे. त्यांच्याकडे यापूर्वी राष्ट्रवादी युवकचे शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. भिंगारमध्ये युवकांचे असलेले संगठन, सामाजिक कार्यात सातत्याने योगदान व राष्ट्रवादी युवकमध्ये कार्यरत असताना त्यांनी केलेल्या विविध कार्याची दखल घेऊन त्यांची भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भिंगार शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडविण्याचे कार्य सुरु आहे. पदाच्या माध्यमातून युवकांचे मोठे संगठन करुन पक्षाला बळकट करण्याचे काम केले जाणार असल्याची भावना सपकाळ यांनी व्यक्त केली.