• Tue. Jul 1st, 2025

मराठी साहित्य मंडळाच्या अहमदनगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे

ByMirror

Sep 18, 2024

महाराष्ट्राशिवाय अनेक राज्यात शाखा

नव्या पिढीमध्ये बदल घडवण्याचे काम साहित्य करू शकते -प्रा. शिवाजी भोर

अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनमान्य मराठी साहित्य मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. केडगाव येथील श्री साईबाबा मंदिरात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे मा. सचिव प्राचार्य शिवाजी भोर होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, नगर जिल्ह्यातील पहिली मराठी साहित्य महामंडळाची शाखा केडगाव मध्ये होत आहे. त्याचा मला खूप आनंद आहे. अनेक वर्षापासून मी साहित्यमध्ये काम करत आहे. एक साहित्यिक आपल्या वाणी व लेखणीतून काय करू शकतो? हे समजला सांगितले पाहिजे. आणि येणाऱ्या पिढी मध्ये कसा बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील रहावे. भारतीय संस्कृती नव्या पिढीला नकोशी झाली आहे. नव्या पिढीमध्ये बदल घडवण्याचे काम साहित्य करू शकते, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मराठी साहित्य मंडळाच्या अहमदनगर शाखेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी केले. मराठी साहित्य मंडळ ही साहित्यिक कार्यक्रम आयोजित करणारी संस्था आहे. महाराष्ट्राशिवाय राजस्थान, गुजरात, दिल्ली, हरियाणा, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश येथेही मंडळाच्या शाखा कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणि 489 तालुक्यांमध्ये शाखा आहेत. राज्यात आतापर्यंत संस्थेचे 20 हजारांहून अधिक सदस्य असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जयप्रकाश घुमटकर यांनी दिली.


जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी साहित्य मंडळाचे सदस्य होण्याचे आवाहन केले. प्रा.सुदर्शन धस, उपाध्यक्ष अनिता काळे, उपाध्यक्ष बबनराव खामकर, सचिव भीमराव घोडके, सदस्या आशा शिंदे यांनी नियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्रे दिली. डॉ.मुकुंद शेवगावकर, अमोल येवले, विक्रम लोखंडे, संतोष यादव, पी.के.वाघ, कृष्णकांत लोणी, अजित कातोरे, सुनील कुलकर्णी, अशोक झिने, डॉ.सुखदेव रणसिंग, मंडळाचे सदस्य व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *