जिल्ह्यातील बौध्द भिख्कू, उपासक आणि उपासिका होणार सहभागी
नगर (प्रतिनिधी)- जगाला युद्ध नको, बुद्ध हवा! हा संदेश घेऊन महाराष्ट्रातील नाशिक मध्ये रविवारी (दि.2 मार्च) रोजी जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान येथे रविवारी सायंकाळी चार वाजता या धम्म परिषदेला प्रारंभ होणार आहे. या परिषदेसाठी भारतासह वेगवेगळ्या देशातील बौध्द भिख्कू उपस्थित राहणार आहेत. या जागतिक बौद्ध धम्म परिषदेसाठी नगर जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) सर्व पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले आहे.
धम्म परिषदेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दादा भुसे, माजी मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय शिरसाट, मंत्री गिरीश महाजन, आरपीआयचे राज्य अध्यक्ष राजा सरोदे, सरचिटणीस गौतम सोनवणे, कार्याध्यक्ष बाबूराव कदम, मुंबई प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ कासारे आदींसह अनेक खासदार, आमदार आणि रिपब्लिकन पक्षाचे राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष पद आरपीआयचे नाशिक जिल्हाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे भूषवीत आहे.
या जागतिक बौद्ध महापरिषदेसाठी महाराष्ट्रातील सर्व बौद्ध उपासक, उपासिका आणि भगवान बुद्धांच्या विचारांचा आदर करणारा समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहे. बौद्ध धम्म परिषदेसाठी नगर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून आणि गावागावातून बौद्ध उपासक, उपासिका आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे म्हंटले आहे.
या परिषदेसाठी नगर जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजय वाघचौरे, जिल्हा कार्याध्यक्ष लॉरेन्स स्वामी, जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ, जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, ज्येष्ठ नेते संजय कांबळे यांच्यासह जिल्हा कार्यकारणी व जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.