• Wed. Jul 2nd, 2025

दिवाळीनिमित्त रविवारी भरणार बचत गटातील महिलांचा अपना बजार शॉपिंग फेस्टिवल

ByMirror

Oct 25, 2024

मृत्युंजय फाउंडेशन व सावित्री शक्तीपीठचा पुढाकार

नगर (प्रतिनिधी)- बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध होऊन दिवाळीनिमित्त बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने मृत्युंजय फाउंडेशन व सावित्री शक्तीपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील न्यू टिळक रोड येथील माऊली मंगल कार्यालयात दिवाळीचा अपना बजार शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय शॉपिंग फेस्टिवल रविवार (दि.27 ऑक्टोबर) व सोमवार (दि.28 ऑक्टोबर) दरम्यान दिवाळीनिमित्त भरणाऱ्या शॉपिंग फेस्टिवलला महिला वर्गाला खरेदीसाठी भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दिवाळीच्या अपना बजार शॉपिंग फेस्टिवलमध्ये विविध दिवाळीनिमित्त लागणारे साहित्य, रांगोळी पासून सजावटीचे साहित्यापासून फराळाच्या पदार्थापर्यंत स्टॉल असणार आहे. घरगुती पध्दतीने बचत गटांनी तयार केलेले पणत्या, आकाश कंदील, तसेच महिला व लहान मुलांचे कपडे, खाद्य पदार्थांचे स्टॉलचा समावेश असणार आहे. तसेच महिलांसाठी खास होम मिनिस्टरचा कार्यक्रम रंगणार आहे. यामधील विजेत्या महिलांना बक्षीसे देण्यात येणार आहे.
या फेस्टिवलमध्ये लकी ड्रॉ ठेवण्यात आला असून, भाग्यवान विजेत्या महिलांना सोने, चांदीचे दागिने व इतर आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत. तसेच संस्थेच्या वतीने समारोपीय कार्यक्रमात वंचित घटकातील गरजू विद्यार्थ्यांना मिठाई व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. या प्रदर्शनात सर्वाधिक व्यवसाय करणाऱ्या बचत गटातील महिलांचा सन्मान देखील केला जाणार आहे. या शॉपिंग फेस्टिवलमध्ये बचत गटांना देखील सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी 9518795077, 9339353535 व 9272597595 व या नंबरवर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *