• Tue. Jul 22nd, 2025

अहमदनगर शहरातील राधा-कृष्ण मंदिरात अन्नकोट उत्सव साजरा

ByMirror

Nov 17, 2023

छप्पन भोगचे नैवेद्य दाखवून महाआरती

भाविकांना महाप्रसादाचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधा-कृष्ण मंदिरात छप्पन भोग अन्नकोटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिरात छप्पन भोगचे नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमासाठी शीख, पंजाबी व सिंधी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


दिवाळी पाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर छप्पन भोग अन्नकोटचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी मंदिरात महिलांनी सादर केलेल्या भजन-किर्तनाच्या कार्यक्रमात भाविक मंत्रमुग्ध झाले. दिवाळीच्या गोवर्धन पूजेनंतर दरवर्षी मंदिरात अन्नकोट उत्सवाचे आयोजन केले जाते. राधा-कृष्ण मंदिरात अन्नकोट महोत्सवासाठी भाविकांनी विविध खाद्य पदार्थ आनले होते.

छप्पन भोगच्या अन्नपदार्थ मंदिरात आकर्षक पध्दतीने सजावट करुन मांडण्यात आले होते. यामध्ये मिठाई व विविध खाद्यपदार्थांचा समावेश होता. पारंपारिक पध्दतीने या सर्व अन्न पदार्थाचा नैवेद्य दाखवून ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता व सर्व विश्‍वस्तांच्या हस्ते आरती करण्यात आली. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे (लंगर) वाटप करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *