आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा; चौकात योगाच्या विविध आसनांचे प्रात्यक्षिक
नगर (प्रतिनिधी)- योग-प्राणायामचा प्रचार प्रसार करणाऱ्या आंनद योग केंद्राच्या वतीने सावेडीत अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सावेडी परिसरात प्रभात योग रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत 250 साधक व विद्यार्थी सहभागी झाले होते. करे योग रहे निरोग, चला उठा योग करा, शिकू आणि शिकवू या साऱ्या जगात योग नेऊ या घोषणांनी सावेडी परिसर दणाणून निघाला.

एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग! ही या वर्षाची थीम घेऊन योग रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये रेणाविकर प्रशाला, केशवराव गाडीलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. भिस्तबाग चौकात सादर करण्यात आलेल्या योगाच्या विविध आसनांच्या प्रात्यक्षिकांनी नागरिकांचे लक्ष वेधले. आयुषमंत्रालयाच्या प्रोटोकॉल प्रमाणे 200 साधकांनी शुभमंगल कार्यालयात योग साधना केली.
जीवन आनंदी व व्याधीमुक्त जगायचे असेल तर योग हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे संपूर्ण जग योगा कडे वळाले आहे. परंतु केवळ आळस आणि कंटाळा यामुळे 80 टक्के लोक योग करत नाहीत. लोकांना योग शिक्षण देणे व योग करायला लावणे हा मुख्य उद्देश आनंद योग केंद्रचा आहे. आतापर्यंत अनेकांनी या केंद्राचा लाभ घेतला असून, नवीन साधक केंद्रामध्ये येत आहेत. सावेडी परिसरातील नागरिकांनी या निशुल्क केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्रप्रमुख दिलीप कटारिया यांनी केले.
या कार्यक्रमासाठी रेणावीकर शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, केशवराव गाडेकर हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल गायकवाड, जयश्री देशपांडे यांचे सहकार्य लाभले. योग शिबिरात प्रशांत बिहाणी, दिलीप पवार. राजेंद्र कलापुरे, सप्तर्षी सर, उषा पवार, सोनाली जाधववार, स्वाती वाळूंजकर, डॉ. मनीषा जायभाय, पूजा ठमके, रेखा हाडोळे, प्राची शिंदे, अपेक्षा संकलेचा, श्लोका रीक्कल यांनी आसंनाची सुंदर प्रात्यक्षिके केली. निहाल कटारिया, नरेंद्र गांधी, दिलीप गांधी, शंकर मिसाळ यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.