दांडिया व गरबाचा उत्साह
पारंपारिक वेशभुषेत दांडियाच्या तालावर थिरकले युवक-युवती
अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित दांडिया नाईटमध्ये युवक-युवती दांडियाच्या तालावर थिरकली. पारंपारिक वेशभुषेतील युवती व महिला मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाल्या होत्या.

टिळकरोड येथील नंदनवन लॉन येथे दांडिया नाईटचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक राजेश भंडारी, किरण सोनवणे, नमिता फिरोदिया व नयना भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले. जिव्हाळा ग्रुपच्या अध्यक्षा अल्पना कासवा व सचिव सविता काळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

नॉन स्टॉप म्युझिक लाईट, डीजेने रंगत आलेल्या दांडिया नाईटमध्ये पारंपारिक वेशभूषेत महिला व युवक-युवतींच्या ग्रुपने दांडिया नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. दांडिया नृत्याच्या कार्यक्रमात युवक-युवतींचा उत्साह संचारला होता. यामध्ये शहरासह जिल्ह्यातील दांडियाचे ग्रुप सहभागी झाले होते. महिलांनी महिलांसाठी राबविलेल्या या उपक्रमात महिलांचा प्रतिसाद लक्षणीय होता.

दांडिया नाईटमध्ये विविध स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. बेस्ट किडस ग्रुप- लिल दांडिया बीट, सर्वोत्कृष्ट किड सोलो- आराध्या तिवारी, सर्वोत्कृष्ट पोशाख (पुरुष)- लॅविश भंडारी, सर्वोत्कृष्ट जोडी (महिला)- वैदेही बोरा, पूजा चंगेडिया, बेस्ट कपल- तृणय आणि श्रध्दा, सर्वोत्तम ड्रेपरी (पुरुष)- अनुप पिपाडा, सर्वोत्तम ड्रेपरी (महिला)- तेजल परमार, उत्कृष्ट नृत्य (पुरुष)- अजिंक्य पवार (प्रथम), साई धोका (द्वितीय), उत्कृष्ट नृत्य (महिला)- दिया मेहता (सोन्याची नथ बक्षीस), अश्विनी सोनी (प्रथम), मोनिका मेहता (द्वितीय), सायली ढोले (तृतीय) तसेच उत्कृष्ट ग्रुप- जैन जलसा (प्रथम), लेट्स नाचो (द्वितीय), मिस्टर जिव्हाळा- दर्शन जग्गड व मिस जिव्हाळा दिप्ती मुंदडा यांनी बक्षीसे पटकाविली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण आकाश सर, ज्योती शहा व प्रिया नागपाल यांनी केले. या कार्यक्रमासाठी श्वेता ठाकूर (गिरीजा ब्युटी पार्लर), डॉ. अमोल जाधव (सरस्वती हॉस्पिटल), संजय साबळे (कन्हैया प्युअर व्हेज), शुभम कटारिया (नॉव ॲण्ड फॉरेवर), दीपक लोढा (आनंद मार्बल), सागर गुरव (बीकेजी ज्वेलर्स), रिना कालरा (डब्ल्यूएल इगो कलेक्शन) यांचे प्रायोजकत्व लाभले. कार्यक्रमासाठी वैशाली चोपडा, अलकाताई मुंदडा, राहुल ठोकळ, श्रीलता आडेप, विशाल लाहोटी, सीए उमेश डोडेजा यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिव्हाळाच्या ग्रुपच्या सर्व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.
