• Thu. Jul 24th, 2025

जगताप कुटुंबियांची बदनामी करुन फिर्यादी खोट्या गुन्ह्यात अडकवित असल्याचा आरोप -ॲड. कराळे पाटील

ByMirror

Dec 13, 2023

कोट्यावधी रुपयांसाठीच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल केल्याने सूड घेतला जात असल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोट्यावधी रुपयांच्या खोट्या आर्थिक फसवणुकीच्या व विविध फौजदारी प्रकरणात गुंतवून अजय जगताप आणि त्यांच्या कुटुंबियांना नाहक बदनाम करण्याचे षडयंत्र फिर्यादी करत आहे. तर सुड घेण्यासाठी जगताप कुटुंबियांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप त्यांचे वकील ॲड. सत्यजीत कराळे पाटील यांनी न्यायालयात जामीनादरम्यान केला आहे.


मध्यंतरी घडलेल्या कोट्यावधी रुपयांसाठीच्या अपहरण प्रकरणात मनीष उर्फ माधव ठुबे हा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ते या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर अजय जगताप, तेजश्री जगताप, बाळासाहेब जगताप, जयश्री जगताप, मनोज जगताप यांची नाहक बदनाम करीत आहे. तर पोलिसांना खोटी माहिती देवून ठुबे जगताप कुटुंबियांवर वेगवेगळे खोटे गुन्हे दाखल करत आहे.


4 नोव्हेंबर रोजी अजय जगताप, तेजश्री जगताप आणि रुपाली मुनोत यांच्या विरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच जगताप यांचे वकील ॲड. कराळे यांनी कोतवाली पोलीसांना तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या कार्यालयीन इमेल वर आणि व्हाट्सअप द्वारे गुन्ह्याची चौकशी केली होती. जगताप हे कोठेही पळून गेलेले नाहीत किंवा भारताबाहेर गेलेले नाहीत याची स्पष्ट कल्पना दिली होती. मात्र प्रसार माध्यमांना खोटी माहिती पुरवली जात असून, त्यामुळे चुकीच्या बातम्या येत असल्याचे त्यांनी चिंता व्यक्त केली.


वास्तविक 13 ऑक्टोबर रोजी शिर्डी येथून अजय बाळासाहेब जगताप, बाळासाहेब गंगाधर जगताप, जयश्री बाळासाहेब जगताप व मनोज यशवंत जगताप यांचे अपहरण मनीश उर्फ माधव ठुबे, सीए दत्ता हजारे, अंतु वारुळे, दत्ता भगत व जिम ट्रेनर अस्मिता यांनी केले होते. त्यांना पैश्‍यासाठी केडगाव बायपास परिसरात आरएमटी बिल्डींगच्या पहिल्या मजल्यावर डांबून ठेवण्यात आले होते. त्यांची सुटका 23 ऑक्टोबर रोजी तेजश्री बाळासाहेब जगताप यांनी पोलीसांच्या मदतीने केली. सदर गुन्ह्यात आरोपी मनीश उर्फ माधव ठुबे व सीए दत्ता हजारे यांना घटनास्थळी अटक करण्यात आली होती. इतर आरोपी हे फरार झाले होते. सदर आरोपींची जामीनावर न्यायालयाने सुटका केली. या प्रकरणाचा राग मनात धरुन मनीश उर्फ माधव ठुबे हा वेगवेगळ्या गुंतवणुक दारांमार्फत अजय बाळासाहेब जगताप व त्यांच्या कुटुंबाविरुद्ध खोट्या फिर्यादी करत असून, त्यांची प्रसार माध्यमातून बदनामी करत असल्याचे अजय बाळासाहेब जगताप, बाळासाहेब गंगाधर जगताप, जयश्री बाळासाहेब जगताप, मनोज यशवंत जगताप व तेजश्री बाळासाहेब जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना बुधवारी (दि.13 डिसेंबर) दिलेल्या अर्जाच्या आधारे प्रसिध्दीपत्रकात ॲड. कराळे पाटील यांनी म्हंटले आहे.


अजय जगताप यांच्या आईला हृदय विकार आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे नगर येथे तपासणी करुन थोडा आराम मिळावा व त्यांच्यासोबत झालेल्या अपहरणाच्या घटनेमधून थोड सावरता यावे यासाठी बाहेर गावी आले आहेत. कोठेही फरार नाहीत अशी माहिती त्यांनी ईमेलद्वारे तोफखाना पोलीस स्टेशन, जिल्हा पोलीस अधीक्षक व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांना तेजश्री जगताप यांनी दिली होती.


अजय जगताप यांनी 08 नोव्हेंबर रोजी जामिनासाठी अर्ज केला होता. सदर अर्ज न्यायालयात प्रवेशित असतानाच 3 डिसेंबर रोजी शिल्पा अतुल सोमनी यांना माधव ठुबे यांनी हाताशी धरुन तोफखाना पोलीसांना खोटी माहिती देऊन गुन्हा दाखल केला. तर 9 डिसेंबर रोजी कोतकर नामाच्या इसमावर लोखंडी रॉडने व चाकुने हल्ला केल्याचा आणखी एक खोटा गुन्हा दाखल केला. मुळातच अजय जगताप व त्याच्या कुटुंबीयांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला असताना आणखी गुन्हा करु शकत नाही. माधव ठुबे हे सुड घेण्यासाठी जगताप कुटुंबियांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचे म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *