सर्व समाजातील नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात राज्यस्तरीय सर्व जातीय निशुल्क वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 11 जानेवारी रोजी सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात होणाऱ्या सावित्री ज्योती महोत्सवात वधू-वर मेळावा होणार असून, यामध्ये राज्यातील सर्व समाजाचे वधू-वर व त्यांचे पालक उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन ॲड. महेश शिंदे, पोपट बनकर, अनिल साळवे, शिवाजी नवले, रावसाहेब काळे पाटील, अशोक कासार, भीमराव उल्हारे, सुनील मतकर, गणेश बनकर, सचिन गुलदगड, शेखर होले, ॲड. सुनील तोडकर, विजय भालसिंग, जालिंदर बोरुडे, राजेंद्र कर्डिले, विशाल गर्जे, अण्णासाहेब पाटोळे आदींनी केले आहे.
आधुनिक काळात सर्वच समाजामध्ये प्रत्यक्ष गाठीभेटींचे प्रमाण कमी झाल्याने मुला मुलींचे विवाह जुळविण्यास अडचणी येत आहेत. तसेच कमी शिक्षण झालेल्या मुले-मुली, शेतकऱ्यांची मुले, गरीब कुटुंबातील, घटस्फोटीत मुले-मुली, आपत्य, विना आपत्य यांचे योग्य स्थळ मिळत नसल्याने विवाह थांबले आहेत. या मेळाव्यातून विवाह जुळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जय युवा अकॅडमी, जनवार्ता, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय संस्था, छावा संघटना आदींच्या सहकार्याने वधू-वर मेळावा होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून, अधिक माहितीसाठी 90047 22330, 9921810096 व 9657511869 व संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
