बेलदार गल्ली मित्र परिवार व डीजे ग्रुपचा सामाजिक उपक्रम
विद्यार्थ्यांनी जीवनाची दिशा व ध्येय ठरवावे -खलील चौधरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील यतीमखाना मधील विद्यार्थ्यांना बेलदार गल्ली मित्र परिवार व डीजे ग्रुपच्या वतीने अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. युवा सामाजिक कार्यकर्ते अकिब चौधरी यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जेष्ठ समाजसेवक खलील चौधरी, नगरसेवक सचिन जाधव, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख, रिपाई शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, जुनेद डीजे, इक्राम शेख, आसीम शेख, रिपाईचे शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, अकिल चौधरी, सोहेल इनामदार, निझाम शेख, तौसिफ शेख, सुफीयान शेख, सद्दाम शेख, सलमान शेख, सोहेल शेख, ईस्माइल बागवान, जुनेद शेख, मोसीन खान, सैफ शेख, फैज पठाण, करण चव्हाण, कैफ खान, उमेर शेख, यासिर शेख, साहिल शेख आदींसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खलील चौधरी म्हणाले की, बिकट परिस्थितीतून व अडचणीतून मार्ग काढावा लागतो. गुणवत्ता असल्यास आर्थिक परिस्थिती यशात अडकाठी ठरत नाही. विद्यार्थ्यांनी जीवनाची दिशा व ध्येय ठरवण्याचे त्यांनी आवाहन केले. खालिद शेख यांनी आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असून, गरजू विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी सर्वांनी हातभार लावण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अकिब चौधरी यांनी समाजाच्या ऋणातून उतराई होण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने सामाजिक योगदान दिल्यास अनेक प्रश्न सुटणार आहे. वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना जीवनात उभे करण्यासाठी सर्व मित्र परिवाराचे सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.