स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक्साईडच्या कामगारांची विसर्जन मिरवणुक उत्साहात
सर्व धर्मिय कामगारांचे एकात्मतेचे दर्शन
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी मधील कामगारांनी सहा दिवसाच्या गणपतीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन केले. स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक्साईड कंपनीत स्थापन केलेल्या श्री गणेशाची विसर्जन उत्साहात मिरवणुक काढून गणरायाला निरोप दिला. सर्व धर्मिय कामगारांनी एकत्र येवून धार्मिक एकात्मतेचे दर्शन घडविले.

सहाव्या दिवशी सकाळी विधिवत पूजा केल्यानंतर कंपनीतील कामगार, संघटनेचे पदाधिकारी व कंपनीतील अधिकाऱ्यांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! चा गजर केला. यावेळी स्वराज्य कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष योगेश गलांडे, पै. दत्तात्रय तापकीरे, पै. सुनील कदम, कंपनीचे प्लांट हेड संदीप मुनोत, बसवराज बकाली, एक्साईड गणेशोत्सव कमिटीचे प्रदीप दहातोंडे, वसीम शेख, संतोष जाधव, विशाल राऊत, प्रवीण कार्जुले, अजिनाथ शिरसाठ, सोमनाथ शिंदे, राहुल जगधने, अभिजीत सांबारे, सागर बोरुडे, जाजगे, फिरोज शेख, अभय जोरवे, आप्पा पानसंबळ, पोपट जगताप, योगेश शेंडे, सागर काळे, स्वप्निल खराडे, दिपक परभणे, भरत दिंडे, प्रविण शिंदे, अमोल ठोकळ, गणेश ठोंबरे, अमोल मेहेत्रे, सागर ठाणगे, संतोष शेवाळे, श्रीकांत राऊत, आप्पा बोंबले, किसन तरटे, संजय शिंदे, शिवा कदम, निलेश हसनाळे, महेश लांडगे, रामदास उकांडे, रमेश पोकळे, विकास शिंदे, दिलीप खोडदे, रामदास खरात, अनिल शिरसाठ आदींसह कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक्साईड कंपनीत श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहाव्या दिवशी बाप्पाला निरोप देताना कामगार वर्ग भारावून गेले. गुलालाची उधळण, पारंपारिक ढोल पथक व डीजेच्या तालावर वाजत-गाजत जल्लोषात गणरायाची मिरवणुक काढण्यात आली होती. मोठ्या उत्साहात निघालेल्या मिरवणुकीत कामगारांनी ठेका धरला होता. विळद घाट येथील तलावात गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

