लखनऊ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघाची निवड
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सातव्या वरिष्ठ राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील मुलींचा संघ विजेता ठरला. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व अहमदनगर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी कृषी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या मैदानात चार दिवस ही स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये दहा जिल्ह्यातील पुरुष खेळाडूंनी तर सहा जिल्ह्यातील महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
अतिशय चुरशीचे सामने या स्पर्धेत रंगले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण राहुरी कृषी विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी, माध्यमिक विभागाचे प्राचार्य अरुण तुपविहिरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक बावा सर, प्राध्यापक जितेंद्र मेटकर, टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले.

महिलांच्या अंतिम सामन्यात अहमदनगरच्या राहुरी येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या संघाने धाराशिव क्रिकेट संघाचा पराभव करत सर्वोत्कृष्ट कामगिरी करून विजेता ठरला. तर मुलांमध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या संघाने तृतीय क्रमांकाचे विजेतेपद मिळवले.
विजय संघाची लखनऊ येथे पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्वामिनी जेजुरकर स्पर्धेतील सर्वोत्तम महिला खेळाडू ठरली. अहमदनगर जिल्ह्याच्या संघात अक्षदा बेल्हेकर (कर्णधार), स्वामिनी जेजुरकर, वृषाली पारधी, ऐश्वर्या चौरसिया, संतोषी भिसे, मृणाल ननवरे, श्रेया सोनवणे, सिमरन शेख, धनश्री शेडगे, नशरा सय्यद राशी पवार, प्रणाली पानसंबळ, लक्ष्मीप्रिया म्हसे, अमृता ढगे, वैष्णवी जावळे आदींचा समावेश होता. विजेत्या खेळाडूंना संघाचे प्रशिक्षक तथा क्रीडाशिक्षक घन:श्याम सानप यांचे मार्गदर्शन लाभले.
विजेत्या संघाचे राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू तथा सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. पी.जी. पाटील, शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.महानंद माने, खजिनदार महेश घाडगे, कल्याण अधिकारी डॉ. महावीर सिंग चौहान, क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी, प्राचार्य अरुण तुपविहिरे, प्राथमिकचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा, एनसीसी प्रमुख संतोष जाधव यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
