अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने 9 व 10 सप्टेंबर रोजी लोणी (ता. राहता) येथे कनिष्ठ वयो गटातील (वय वर्ष 14, 16, 18, 20) मुला-मुलींच्या ॲथलेटिक्स स्पर्धा रंगणार आहे.
कनिष्ठ गटातील ॲथलेटिक्स स्पर्धेचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानात होणार आहे. यामध्ये 14, 16, 18 व 20 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे. यामधील प्रथम दोन क्रमांकाच्या खेळाडूंची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.
स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात देणार आहे. त्याचप्रमाणे सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे. सर्व खेळाडूंनी आपली प्रवेशिका स्पर्धाच्या दिवशी सकाळ 9.00 वाजे पर्यंत जमा करण्याचे सांगण्यात आले आहे. 9 सप्टेंबर रोजी दुपारी स्पर्धेला प्रारंभ होणार असून, या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे रंगनाथ डागवाले व सुनील जाधव यांच्याकडून करण्यात आले आहे. या स्पर्धांचे प्रमाणपत्र 5 टक्के आरक्षण व 10 वी, 12 वीच्या गुणांसाठी उपयोगी येणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दिनेश भालेराव, राहुल काळे, संदीप हारदे, जगन गवांदे, श्रीराम सेतु आवारी, संदीप घावटे, अजित पवार, संभाजी ढेरे परिश्रम घेत आहे.
राज्यस्तरीय स्पर्धा 14 व 16 वर्षे आतील 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर दरम्यान डेरवन, रत्नागिरी येथे होणार आहे. तर 18 व 20 वर्षे आतील राज्यस्तरीय स्पर्धा 4 व 5 ऑक्टोबर रोजी पुणे येथील बालेवाडीत होणार आहे. अधिक माहितीसाठी दिनेश भालेराव 9226238536, राहुल काळे 8830863116, संदीप हारदे 9657603732 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.