माता आणि नवजात शिशु आहार या महत्त्वपूर्ण विषयावर करणार मार्गदर्शन
नगर (प्रतिनिधी)- शहरातील आहारतज्ञ डॉ. माधुरी ठोंबरे यांची पुन्हा एकदा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर मुलाखतीसाठी निवड झाली आहे. माता आणि नवजात शिशु आहार, या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर त्यांच्या मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण गुरुवारी (दि.17 एप्रिल) दुपारी 12 वाजता प्रसारित होणार आहे.
गेल्या वर्षीही डॉ. माधुरी ठोंबरे यांना या राष्ट्रीय मंचावर आमंत्रित करण्यात आले होते. यंदाही त्यांच्या कार्याची दखल घेत मुंबई येथील दूरदर्शन स्टुडिओमधून ही विशेष मुलाखत थेट प्रक्षेपित होणार आहे. त्यांच्या ज्ञानाची आणि अनुभवाची दखल घेणे हे केवळ संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. मातांनी आणि नवजात बालकांच्या पोषणात नेमकी काळजी कशी घ्यावी, कोणते अन्नपदार्थ योग्य आहेत, चुकीच्या सवयींमुळे होणारे परिणाम यासारख्या विषयांवर डॉ. ठोंबरे मार्गदर्शन करणार आहेत.