वर्ग मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणींना दिला उजाळा
नगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील सन 1988 च्या इयत्ता दहावी (एसएससी) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शहरात उत्साहात पार पडला. 37 वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

स्नेह मेळाव्यानिमित्ताने एकत्र आलेल्या वर्ग मित्र-मैत्रिणींनी शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, क्रीडा स्पर्धा, वर्गात मिळालेली शिक्षा, स्नेहसंमेलनातील अनेक गोड आठवणी सांगितल्या. माजी विद्यार्थ्यांनी जुन्या मित्रांबरोबर एकच धमाल करुन, आयुष्य घडविणाऱ्या माजी शिक्षकांसमोर नतमस्तक झाले. राज्याच्या विविध भागातून माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी कार्यक्रमासाठी हजर होत्या.

वाळकी मधील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील सन 1988 च्या इयत्ता दहावी मधील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एका व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून सर्व जुने सवंगडी एकमेकांच्या संपर्कात असतात. व्हाट्सअपच्या माध्यमातून एकत्र आलेले माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमातून एकवटले होते.
कार्यक्रमास उपस्थित तत्कालीन शिक्षकांनी सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींना नोकरी व्यवसाय करत असताना कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत, मुलांवर चांगले संस्कार करावेत, समाज हिताची कामे करावी, शरीर प्रकृती चांगली राहण्यासाठी नियमित व्यायाम करण्याचे मौलिक मार्गदर्शन केले. माजी शिक्षिका जाधव मॅडमने यावेळी आपल्या विद्यार्थ्यांसाठी कविता सादर केल्या. तसेच माजी शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना जणू वर्गच भरविला होता. आपल्या लाडक्या शिक्षकांशी देखील विद्यार्थ्यांनी मनमुराद गप्पा मारुन जुन्या आठवणी सांगितल्या. उपस्थित मित्रांनी आपल्या भावना व्यक्त करुन जुन्या चांगल्या-वाईट आठवणीचा इतिहास मांडताना सर्वच भारावले.
स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग, दत्तात्रय लाड, रवींद्र नाईक, राम मुनफन, योहान पंचमुख, अरुण कुंजीर, बाळासाहेब भालसिंग, संगीता जपे, राजू माने, संगिता मते, रामदास इंगळे, महेश आसुदाणी, सुधीर कुलकर्णी, राजेंद्र खेडकर, रामभाऊ इंगळे, अनिल कजबे, राजू मुरूमकर, उज्वला राऊत-साळुंके, विद्या कोतकर-झिने, छाया भालसिंग-बागल, तानाबाई सातपुते-खामकर, नगमा शेख-पठाण, सुनीता कातोरे-पवार, निता गायकवाड, भारती भालसिंग, विद्या कोतकर यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते.
याप्रसंगी तत्कालीन शिक्षक प्रभाकर मुळे, रामभाऊ काटकर, अशोक बागल, सर्जेराव जगदाळे, अलका जगदाळे, उमाकांत महांडुळे, मीरा महांडुळे, उत्तम काळे, बाबुराव फळके, ज्ञानदेव बोठे, दिगंबर बोरुडे, साहेबराव अनभुले, छबुराव विलायते, पद्मा जाधव, मंगला लोखंडे, विजय टेमक, संपतराव जगदाळे आदी उपस्थित होते. सर्व माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला होता.