अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या नोटरी पब्लिकपदी ॲड. एफ.के. शेख यांची नियुक्ती झाल्याबद्दल सावेडीत त्यांचा सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्कार केला. यावेळी संतोष जाधव, संजय डहाणे, दीपक पवार, नंदू भिंगारदिवे, जिल्हा चाप्टर कोर्टाचे रामभाऊ परदेशी, व्यापारी पुरीशेठ, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.
संतोष जाधव यांनी ॲड. एफ.के. शेख यांचे वकिली व्यवसाय करताना सामाजिक कार्यात देखील योगदान असून, गरजू घटकातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. झालेली निवड ही त्यांच्या कार्याची पावती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.