होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पैठणी, सोन्याची नथसह महिलांनी पटकाविले विविध बक्षिसे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड आदर्शनगर येथे शारदीय नवरात्रोत्सव धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेण्यात आला. महिलांच्या विविध स्पर्धेने होम मिनिस्टरचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. रंगलेला हा खेळ पैठणीचा कार्यक्रमात विविध स्पर्धेचा सामना करीत महिलांनी विविध खेळाचा आनंद लुटला. पैठणी व सोन्याची नथसह महिलांनी विविध बक्षिसे पटकाविली. या कार्यक्रमात परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंगलताई गाडळकर, लता शिंगवी, स्वाती गाडळकर, अरुणा काळे, सुनिता ढोकळे, सोनम गाडळकर, नंदिनी घुमरे, वैशाली सैंदर, सुजाता मते, अनुराधा वाघ, रोहिणी कानडे, सविता कानडे, पुनम दळवी, मंगलताई गाडळकर, वैशाली पाटील, सुनिता लोंढे, उषा शेळके, सिंधू भणगे, रजनी गोबरे, अश्विनी सैंदर, विद्या व्यवहारे, सारिका ढगे, सुशिला गायकवाड, आशा झावरे आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सोनम गाडळकर म्हणाल्या की, संस्कृतीचा वारसा महिलांमुळे जपला जात आहे. कार्यक्रमानिमित्त एकत्र येताना महिला विचारांचा जागर करत आहे. प्रत्येक महिलेमध्ये विविध सुप्त कलागुण असतात. पण संसाराच्या जबाबदाऱ्या पेलविताना तिच्यामध्ये असलेले कलागुण कोमजतात. या नवरात्रोत्सव कार्यक्रमातून तिच्या कलागुण वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

दत्ता गाडळकर म्हणाले की, धावपळीच्या व तंत्रज्ञानाच्या युगात एकमेकांशी संवाद संपत चालला आहे. मात्र भारतीय संस्कृतीमधील सण-उत्सव एकमेकांना जोडण्याचे काम करतात. सण-उत्सवाच्या कार्यक्रमातून चांगल्या विचारांची व संस्काराची रुजवण होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना शुभेच्छा दिल्या.

सुयोग पार्क मध्ये प्रा. प्रकाश लगड व प्रा. दिपाली लगड यांनी घेतलेल्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात महिलांनी विविध खेळाच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला. यामध्ये विविध खेळांचे फेऱ्या पार पडल्या. विविध स्पर्धेचे टप्पे पार करुन महिलांनी बक्षिसांची लयलुट केली. यामध्ये विजेत्या ठरलेल्या सुरेखा हळनोर होम मिनिस्टरच्या पैठणी बक्षिसाच्या मानकरी ठरल्या. द्वितीय बक्षिस ज्योती घोडके यांना सोन्याची नथ व तृतीय आलेल्या क्रांती देवकर यांना चांदीचा गणपती बक्षीस स्वरुपात देण्यात आला. तसेच विविध फेरीतील व प्रश्नमंजुषा मधील विजेत्या महिलांना विविध बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती.
