डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या नर्सिंग कॉलेज व हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम
रुग्णांची सुरक्षितता, संसर्गाचा धोका, प्रतिबंधक उपाय योजनेबद्दल मार्गदर्शन
नगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग, मेडिकल, सर्जिकल नर्सिंग आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्ण सुरक्षा आणि संसर्ग प्रतिबंध नियंत्रण या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचा उद्देश परिचारिकांना व विद्यार्थ्यांना रुग्णालयीन परिस्थितीत रुग्णांची सुरक्षितता, संसर्गाचा धोका, प्रतिबंधक उपाय योजना तसेच सुरक्षिततेचे नियम याविषयी माहिती देण्याबाबत होता.
या कार्यशाळेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व वैद्यकीय संचालक डॉ.अभिजित दिवटे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन च्या कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य डॉ. प्रतिभा चांदेकर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शनासाठी डॉ. राहुल देशमुख, डॉ. जयश्री पोहेकर, आशा पाटील, भानुदास सावंत आणि मोनाली कोल्हे हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेचे आयोजन डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन च्या कॉलेज ऑफ नर्सिंग मधील मेडिकल सर्जिकल नर्सिंग विभागाच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या कार्यशाळेसाठी शिक्षकवृंद, परिचारिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेमध्ये हॉस्पिटल मधील संसर्ग प्रतिबंध नियंत्रण व रुग्णांची सुरक्षा यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले. यासाठी स्कील लॅबमधील मानवी प्रतिकृती चा उपयोग करण्यात आला. परिचारिका व विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणादरम्यान रुग्णांची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षित नियमांचे पालन, हातांची स्वच्छता, वैयक्तिक संरक्षण उपकरणे चा योग्य वापर, आणि संसर्ग साखळी तोडण्याचे उपाय या बाबी शिकवण्यात आल्या.
कार्यशाळेच्या शेवटी प्रश्नोत्तरे सत्र घेतले गेले व सहभागींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मेडिकल सर्जिकल नर्सिंगचे विभाग प्रमुख अमोल टेमकर, सहाय्यक अध्यापक निलेश म्हस्के, सहयोगी अध्यापिका वर्षा शिंदे, पूजा मोरे, ऋषाली कुंजीर, ऋतुजा शिनारे, शुभम विखे व एनएबीएच समन्वयक डॉ. आम्रपाली गायकवाड यांचे सहकार्य लाभले.
