• Thu. Feb 5th, 2026

परताव्या पोटी दिलेला धनादेश न वटल्याने आरोपीला कारावास

ByMirror

Feb 5, 2026

1 लाख 70 हजार रुपये दंडाचा आदेश

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर शहरातील कल्पतरू मल्टीपर्पज को.ऑप.सो. या पतसंस्थेला परताव्या पोटी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी नगर येथील अति. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी धनोज दत्तात्रय शिंदे यांना 1 महिना कठोर कारावास व 1 लाख 70 हजार रुपये दंड एक महिन्याच्या आत भरणे व दंड न दिल्यास 3 महिने अधिकचा कठोर कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 278(2) नुसार नि.इ.कलम 138 मध्ये आरोपीला दोषी धरण्यात आले आहे.


आरोपीने पतसंस्थेकडून मध्ये 1,00,000/- रुपये चे कर्ज घेतले होते. त्या कर्जाच्या रकमेचा परतावा म्हणून आरोपीचे खाते असलेल्या बंधन बँक, शाखा केडगाव, अहिल्यानगर चा 1 लाख 57 हजार 287 रुपयांचा धनादेश फिर्यादीला दिला होता. तो फिर्यादी संस्थेने वटण्यास बँकेत भरला असता अनादरीत झाला. त्यानुसार फिर्यादीने न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. संस्थेच्या वतीने अशोक दत्तात्रय तांबे यांची साक्ष महत्वाची ठरली. प्रकरणात दाखल केलेला कागदोपत्री पुरावा व फिर्यादीच्या वतीने ॲड. कौस्तुभ कुलकर्णी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस दोषी धरण्यात आले. या कामी फिर्यादी संस्थेकडून ॲड. कौस्तुभ कुलकर्णी यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. गणेश शेटे, ॲड. आशिष जाधव, ॲड. जैद शेख यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *