नगर (प्रतिनिधी)- पाथर्डी येथील औषधाच्या दुकानात औषध घेण्यासाठी आलेल्या आरोपीने तेथे उभे असलेल्या 12 वर्षीय मुली बरोबर अश्लील वर्तन केल्याबाबत पीडीतेच्या आईने गणेश राजू भोसले यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 74, 352 व लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 8, 12 अन्वये गुन्हा दाखल केलेला होता.
सदर प्रकरणात ॲड. आकाश कावरे यांनी आरोपीच्या वतीने जामीन अर्ज दाखल करून न्यायालयासमोर आरोपीच्या वतीने युक्तिवाद केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश कोर्ट नंबर 5 यांनी आरोपीचा जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने ॲड. आकाश कावरे यांनी काम पाहिले.