अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सामाजिक कार्यकर्ते आबिद हुसेन यांची समाजवादी पार्टी पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. माजी जिल्हाध्यक्ष राहिलेले हुसेन पुन्हा राजकारणात सक्रीय झाले असून, त्यांच्याकडे शहराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आसिम आजमी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीत हुसेन यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश प्रमुख महासचिव परवेज सिद्दिकी, अब्दुल रऊफ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आबिद हुसेन तीस ते पस्तीस वर्षापासून समाज कार्यात सक्रीय आहे. यापूर्वी त्यांनी समाजवादी पार्टीची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांचे अल्पसंख्यांक समाजात मोठा जनसंपर्क असून, युवा वर्ग त्यांच्याशी जोडला गेलेला आहे. शहराच्या व समाजाच्या विविध ज्वलंत विषयांवर त्यांनी आंदोलन करुन न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हुसेन यांनी जिल्ह्यात पुन्हा समाजवादी पार्टी पक्षात नवचैतन्य निर्माण करुन पक्ष वाढीचे कार्य केले जाणार असल्याची भावना व्यक्त करुन, लवकरच पक्षाची नवीन शहर कार्यकारिणी जाहीर करण्याचे म्हंटले आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.