अहमदनगर (प्रतिनिधी)- घोसपुरी (ता. नगर) येथील अभिमन्यू भगवान भोसले यांचे वयाच्या 73 व्या वर्षी नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. धार्मिक व सामाजिक कार्याची आवड असल्याने ते सर्वांना सुपरिचित होते त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा आरपीआयचे (आठवले) तालुका अध्यक्ष अविनाश भोसले यांचे ते वडील होते.