सोसायटीला आमदात सत्यजित तांबे यांची भेट
बँकेची अधिक प्रगती करुन सभासदांना लाभ द्यावा -आ. सत्यजित तांबे
नगर (प्रतिनिधी)- अ. नगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को-ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड, अहिल्यानगर च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात आला.
आमदार सत्यजित तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी तांबे म्हणाले की, सहकार व लोकशाहीत जय पराजय होत असतो. ज्याला संधी मिळेल त्याने संधीचे सोन करून संस्था पुढे घेऊन ज्यावी. ही बँक मोठी होण्यामागे सर्व सभासद, संचालक याचे कष्ट आहे. या बँकेची स्थापना मोठ्या मातब्बर शिक्षकांनी केली आहे. त्यांची वाटचाल देखील दैदिप्यमान आहे. बँकेचे कर्ज वाटप 995 कोटी रुपयाचे कर्ज वाटप आहे. 11 हजार सभासद असून मोठी आर्थिक उलाढाल बँकेच्या माध्यमातून केली जात आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नवीन पॅनल निवडून आला. या नवीन संचालक मंडळाने बँकेची अधिक प्रगती करुन सभासदांना लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे स्पष्ट करुन त्यांना पुढील कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात चेअरमन आप्पासाहेब शिंदे यांनी बँकेच्या कामकाजाबद्दल माहिती दिली. तसेच सर्व संचालक बँकेच्या हिताचेच निर्णय घेणार आहेत. संस्था टिकली पाहिजे. आमचे संचालक मंडळ हे थोडया दिवसा पूर्वीच सत्तेत आलेले आहे. परंतू मागील काळातील जे काही काम राहिले आहे. हे संचालक मंडळ पूर्ण करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी आमदार तांबे यांनी चेअरमन आप्पासाहेब शिंदे, व्हाईस चेअरमन अर्जुन वाळके यांच्यासह सर्व संचालकांचा सत्कार केला. याप्रसंगी संचालक सुनिल दानवे, उमेश गुंजाळ, महेंद्र, हिंगे, राजेंद्र कोतकर, सुधीर कानवडे, संभाजी गाडे, किशोर धुमाळ, आप्पासाहेब जगताप, बाळाजी गायकवाड, छबु फुंदे, साहेबराव रक्टे, शिवाजी लवांडे, बाजीराव अनभुले, अतुल कोताडे, विजय पठारे, सुरज घाटविसावे, बाबासाहेब बोडखे, वर्षा खिलारी, वैशाली दारकुंडे, उध्दव सोनवणे, सचिन जाधव, सचिव स्वप्निल इथापे आदी उपस्थित होते.