विविध स्पर्धेचा महिलांनी लुटला आनंद; पैठणी, सोन्याची नथ व चांदीच्या नाण्यासह महिलांनी पटकाविले बक्षिसे
संस्कृतीचा वारसा महिला जपत आहे -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी उपनगरातील भिस्तबाग चौकात महिलांसाठी होम मिनिस्टरचा रंगला होता. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज शिंदे मित्र मंडळाचे अध्यक्ष पै. सुरज शिंदे व राष्ट्रवादी युवती काँग्रेस विधी कक्षाच्या प्रदेश प्रमुख ॲड. अंजली आव्हाड यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात परिसरातील महिलांसह युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रंगलेला हा खेळ पैठणीचा कार्यक्रमात विविध स्पर्धेचा सामना करीत महिलांनी विविध खेळाचा आनंद लुटला. पैठणी, सोन्याची नथ व चांदीच्या नाण्यासह महिलांनी विविध बक्षिसे पटकाविली.
या कार्यक्रमासाठी अश्विनी शिंदे, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, युवक जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, कामगार सेलचे गजेंद्र भांडवलकर, वैभव ढाकणे, अमित खामकर, सुजाता दिवटे, सुनिता गुगळे, नैना शेलार, श्रध्दा जपकर, अंजली चौधरी, राहुल शिंदे, अखन शिंदे, जालिंदर शिंदे, मुसला धनगर, सागर शिंदे, नवनाथ शिंदे, नितीन शिंदे, शिवा शिंदे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी भिस्तबाग चौकात मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते. राजेंद्र टाक यांनी घेतलेल्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात महिलांनी विविध खेळाच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला. यामध्ये विविध खेळांचे फेऱ्या पार पडल्या. विविध स्पर्धेचे टप्पे पार करुन महिलांनी बक्षिसांची लयलुट केली. सोडत पध्दतीने 201 आकर्षक बक्षीसे व 51 साड्या भाग्यवान महिलांना वाटण्यात आल्या. होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात प्रथम विजेत्या महिलेस पैठणी, द्वितीय बक्षीस सोन्याची नथ व तृतीय बक्षीस चांदीचे नाणे देण्यात आले. तसेच विविध फेरीतील विजेत्या महिलांना बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती.
आमदार संग्राम जगताप यांनी कार्यक्रमास भेट देऊन विजेत्या महिलांना बक्षीस वितरण केले. आमदार जगताप म्हणाले की, संस्कृतीचा वारसा महिला जपत आहे. सण-उत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येणाऱ्या महिला विचारांचा जागर करत आहे. प्रत्येक महिलेमध्ये विविध सुप्त कलागुण असतात. पण संसाराच्या जबाबदाऱ्या पेलविताना त्यांच्यात असलेल्या कलागुण कोमजतात. मात्र अशा उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले व या उपक्रमाचे कौतुक केले.