जातीयवादी प्रवृत्तीच्या गुंडांवर कारवाई करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- जेसीबीने चप्पलचे दुकान पाडणाऱ्या जातीयवादी प्रवृत्तीच्या गुंडांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चर्मकार समाजाच्या महिलेने पारनेर तहसिल कार्यालया समोर उपोषण केले. दुकान पाडणाऱ्या गुंडांवर कारवाई होत नाही, तो पर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा आक्रमक पवित्रा सदर महिलेने घेतला आहे.

भाळवणी येथे शांताबाई आंबेडकर यांचे चप्पलचे दुकान आहे. मुंबई येथे असलेले भाळवणीचे मत्स्य व्यावसायिक आंबेडकर यांची चप्पलची दुकान विकत माघत होते. परंतु आंबेडकर यांनी सदर दुकान विकण्यास नकार दिला. याचा राग येऊन त्यांनी काही जातीयवादी प्रवृत्तीच्या गुंडांना हाताशी धरुन सदरची चप्पल दुकान पाडली आहे. सदर मत्स्य व्यावसायिक मुंबईला बसून सर्व सूत्र हलवित आहे. पारनेर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार करुन देखील संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली नाही. गुन्हा दाखल केल्याप्रकरणी सदर गुंड व्यक्ती जीवे मारण्याची धमकी देऊन चप्पलच्या दुकान जवळ अनाधिकृत बांधकाम करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला तो मत्स्य व्यावसायिक व त्याच्या सांगण्यावरुन दुकान पाडणारे गुंडांवर कायदेशीर कारवाई करावी, नुकसान झालेल्या मालाची भरपाई मिळावी, गुंडांपासून संरक्षणाच्या दृष्टीकोनाने कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे, दुकान पाडण्यात आलेले जेसीबी जप्त करुन त्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंबेडकर यांनी केली आहे.