सण उत्सवानिमित्त सॅमसंगचे सर्व नवनवीन उत्पादने आकर्षक ऑफरमध्ये होणार उपलब्ध
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील राम रेफ्रिजरेशन आणि इलेक्ट्रॉनिक्सला सॅमसंगचे एक्स्पॅट सीई सेल्स वेस्ट रीजन युनसुंग ह्वांग यांनी भेट देऊन बिझनेस मिटींग घेतली.
या बैठकीत येणाऱ्या सण उत्सवानिमित्त सॅमसंगचे सर्व नवनवीन उत्पादने आकर्षक ऑफरमध्ये उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

साऊथ कोरिया येथून शहरात आलेले युनसुंग ह्वांग यांचा राम रेफ्रिजरेशन आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने स्वागत करुन सत्कार करण्यात आला. यावेळी रिजनल सेल्स हेड वेस्ट आशुतोष चाकडी, ब्रँच मॅनेजर (पुणे) भूषण कुरमभाटी, रिजनल ट्रेड मार्केटिंग मॅनेजर पश्चिम विभाग समीर मारवाह, राम रेफ्रिजरेशन आणि इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक रामानंद मेंघानी, परमानंद मेंघानी, विष्णू मेंघानी, जेठानंद मेंघानी, पंकज मेंघानी, रवी मेंघानी, मोनेश मेंघानी, हर्ष मेंघानी आदी उपस्थित होते.