• Wed. Jul 2nd, 2025

शिर्डीला साईबाबांच्या समाधीवर खासदार वाकचौरे यांच्या हस्ते ठेवला जाणार प्रस्ताव

ByMirror

Sep 26, 2024

निसर्ग श्रीमंत भारत आणि लोकभज्ञाक भारत चळवळीचा प्रस्तावाचे होणार पूजन

समाज आणि परिसर समृध्द करण्याचे तंत्र

अहमदनगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने शिर्डी येथील साईबाबांच्या समाधीवर निसर्ग श्रीमंत भारत चळवळ आणि लोकभज्ञाक भारत चळवळीचा प्रस्ताव शिर्डी मतदारसंघांचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पुरूषोत्तम वायाळ आणि ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


भारतात वर्षभर प्रखर सुर्यप्रकाश मिळतो, मान्सूनचा पाऊस देखील क्वचितच पडणाऱ्या दुष्काळा व्यतिरिक्त चांगला असतो. या विस्तिर्ण देशात कोट्यवधी एकर जमीन उपलब्ध आहे. सरासरीने ग्लोबल वार्मिंगचा सध्या त्रास सुरू आहे.एकंदरीत भारतात नैसर्गिक साधनसंपत्ती अमाप आहे, परंतू एकात्मिक ज्ञान सिद्धांताच्या अभ्यासाअभावी लाखो एकर जमिनी पड झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे आणि पावसाचे पाणी जमिनीखालच्या साठ्यांमध्ये न साठविल्यामुळे भारतातील मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्या करतात. शेती आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेली आहे, त्याला कारण म्हणजे सदोष सरकारी धोरणे आणि चांगल्या धोरणांच्या अंमलबजावणीचा अभाव असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.


लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीतून या देशातील लोकशाही उन्नत करण्याचा या संघटनांचा प्रयत्न आहे.लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीशी बांधिलकी असलेल्या लोकांना जनतेचे प्रतिनिधी होण्याचा अधिकार दिला पाहिजे. त्यासाठी मतदारांमध्ये मोठ्या जागृतीची गरज आहे. रेनगेन बॅटरी आणि ग्रीनगेन बॅटरीच्या माध्यमातून देशातील लाखो जिरायतदार शेतकऱ्यांना हंगामी बागायतदार करता येईल. वंदे किसान गुडस्‌ ट्रेन्सच्या माध्यमातून शेतीमालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, त्याशिवाय शहरी भागांमध्ये विस्तारणारे सिमेंटचे जंगले यावर देखील मात करता येणार आहे. आजपर्यंत भारतात पावसाळ्यात झाडे लावून फोटो काढून प्रसिद्धी मिळविण्याचे उद्योग दरवर्षी सातत्याने होतात, परंतु चांगल्या मोठ्या रोपांच्या शेजारी रेनगेन बॅटरी आणि रोपांच्या संरक्षणासाठी ट्रीगार्ड यातून देशात कोट्यवधी झाडांची लागवड करून जोपासना करता येणार आहे.


रेनगेन बॅटरीमुळे उन्हाळ्यात देखील झाडांना जमिनीतून किमान ओलावा उपलब्ध होतो. त्यामुळे बाहेरून पाणी देण्याची फारशी गरज लागत नाही. विशेषत: पावसाळ्यातील वृक्षलागवडीला जास्त महत्व आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे देशभरातील सदाहरित रस्त्यांसाठी रेनगेन बॅटरीचा आग्रह करणार असल्याचे मान्य केले आहे. रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांच्याकडेसुद्धा वंदे किसान गुडस्‌ ट्रेन्स्‌ बाबतची चर्चा करून आग्रह धरणार असल्याचे त्यांनी कबूल केले आहे. साईबाबांच्या समाधीवर प्रस्ताव ठेवण्यासाठी ॲड. कारभारी गवळी, डॉ. पुरूषोत्तम वायाळ, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, अशोक वाकचौरे, शाहीर कान्हू सुंबे, वीर बहादूर प्रजापती, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *