• Sat. Jul 19th, 2025

शहरात इन्स्पायरच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात

ByMirror

Feb 1, 2024

देशभरातील 720 विद्यार्थी सहभागी

स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षणाची गरज -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात इन्स्पायर अबॅकस अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेली राष्ट्रीय स्तरावरील ऑफलाईन अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला महाराष्ट्रासह इतर राज्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. देशभरातून तब्बल 720 विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.


नगर-कल्याण रोड येथील अमरज्योत लॉन मध्ये झालेल्या अबॅकस स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय वन अधिकारी सचिन कंद, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडुस, गुरुदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संतोष मगर, शिक्षण संचालक (उच्च शिक्षण विभाग) संचालक अशोक बागल, शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, रोहीदास कर्डिले, सचिन कोतकर, सरीता खेडेकर, छायाताई मगर, जयसिंग कारखेिले, संजय ठोंबरे, ॲड. महेश वारे, नामदेव वाळके, मोहनतात्या वाळके, गोपाळभाऊ रक्ताटे, बलभिम शेळके आदी उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षणाची गरज आहे. स्पर्धा परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना अबॅकस हा सर्वोत्तम पर्याय आहे. अबॅकसने मोठ-मोठ्या गणिताची प्रक्रिया काही क्षणातच सोडविता येते. तर मुलांचा उजचा व डावा मेंदू कार्यान्वीत होवून कुशाग्र बुध्दीमत्तेने मुले आपला विकास साधतात. अबॅकसने मुलांमध्ये एकाग्रता, वैचारिक गती व गुणवत्ता वाढीस लागत असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात दादासाहेब शेळके यांनी इन्स्पायर अबॅकस अकॅडमी ही शालेय विद्यार्थ्यांसाठी शास्त्रीय संकल्पनेवर आधारित परिपूर्ण बौद्धिक विकास करणारे केंद्र असून, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी अबॅकस व वैदिक गणिताचे प्रशिक्षण देणारी संस्था असल्याचे सांगितले.


राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी पैकी शिवमल्हार वैराळ, स्वरा खंडागळे, आराध्य मते, श्रेया रक्ताटे, तन्वी अबुज, श्रीयान ताडस, आर्वी पायाळ, जान्हवी ठाकरान, संस्कृती पाटील, नक्ष वांगदरे, राजलक्ष्मी निंबाळकर, नचिकेत खडके, अंशुमन रोहीला, अक्षदा पाटील, धिरज शिंदे या विद्यार्थ्यांना चॅम्पियन ट्राफीचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच अकॅडमीच्या वतीने आरती सायंबर, शांता गावखरे, उज्ज्वला हिरवे, मंगल खेडेकर, भाग्यश्री कोठे, किरण परदेशी, पूनम काळे, मिनाक्षी शहाणे, पुजा गुंजाळ या शिक्षिकांना बेस्ट टीचर अवार्ड व अश्‍विनी रक्ताटे व वंदना वाळके यांना स्टार टिचर अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रदिप भद्रे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अकॅडमीचे सर्व संचालक मंडळ व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *