• Sat. Sep 20th, 2025

शहराच्या कोठला येथील हॉटेलला मध्यरात्री भीषण आग

ByMirror

Jun 12, 2025

अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला;


जीवितहानी टळली पण हॉटेलचे मोठे आर्थिक नुकसान

नगर (प्रतिनिधी)- शहरातील कोठला, राज चेंबर्स परिसरात असलेल्या ओन्ली कुरेशी हॉटेलला बुधवारी (दि. 11 जून) रात्री अचानक भीषण आग लागली. हॉटेल बंद झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास ही आग लागली. हॉटेलमधील काम आटोपून कर्मचारी स्टाफ रुममध्ये विश्रांती घेत असताना त्यांना हॉटेलमध्ये आग लागल्याचा फोन आला.


संदेश मिळताच कर्मचारी तात्काळ घटनास्थळी धावले व त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तातडीने अग्निशमन विभागाला संपर्क करून आग लागल्याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांच्या प्रयत्नांनी आग नियंत्रणात आणण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.


या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हॉटेलचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हॉटेलमधील फर्निचर, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, किचन साहित्य आदी जळून खाक झाले. हॉटेलचे संचालक समीर कुरेशी यांनी आग कोणी लावली का? किंवा ती शॉर्टसर्किटमुळे लागली याचा अद्याप खुलासा झालेला नाही. यासंदर्भात योग्य ती चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली असल्याची माहिती दिली. सध्या आग लागण्याचे कारण अस्पष्ट असून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. आगमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *