तीन सामने अनिर्णित तर ओऍसीस व आठरे पाटील स्कूलचे संघ विजयी
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (दि.28 सप्टेंबर) अनिर्णित सामन्यांचा खेळ रंगला होता. तुल्यबळ संघ एकमेकांना भिडल्याने शेवट पर्यंत सामने निर्णायक ठरले. यामध्ये झालेल्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात दोन्ही संघांकडून एकही गोल न झाल्याने तिन्ही सामने अनिर्णित राहिले. तर उर्वरीत दोन सामन्यात ओऍसीस इंग्लिश मीडियम स्कूल व आठरे पाटील स्कूलच्या संघांनी विजय मिळवला.

14 वर्ष वयोगटात डॉन बॉस्को विरुध्द प्रियदर्शनी स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यामध्ये शेवट पर्यंत दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही. 0-0 गोलने हा सामना अनिर्णित राहिला.
दुसरा सामना अशोकभाऊ फिरोदिया विरुध्द ओऍसीस इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यात झाला. यामध्ये पहिल्या हाफ मध्ये दोन्ही संघाकडून एकही गोल झाला नाही. सेकंड हाफमध्ये ओऍसीस इंग्लिश मीडियम स्कूलचा ओम पवार याने 1 गोल करुन विजय खेचून आणला. 0-1 गोलने ओऍसीस इंग्लिश मीडियम स्कूलचा संघ विजयी झाला.

आठरे पाटील स्कूल विरुध्द ओऍसीस इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात आठरे पाटील स्कूलच्या खेळाडूंनी दमदार खेळी करुन प्रतिस्पर्धी संघावर तब्बल 7 गोल केले. आठरे पाटील कडून अशोक चंद व सारंग पाथ याने प्रत्येकी 2 गोल तर साई गोलांडे व ओम लोखंडे याने प्रत्येकी 1 गोल केला. तर ओऍसीस इंग्लिश मीडियम कडून शिवम याला एकमेव गोल करता आला. 7-1 गोलने आठरे पाटील स्कूलचा संघ विजयी झाला.
12 वर्ष वयोगटात ओऍसीस इंग्लिश मीडियम स्कूल विरुध्द तक्षीला यांच्यात झालेला सामना शेवट पर्यंत निर्णायक राहिला. यामध्ये उत्कृष्ट खेळी करुनही संघांना गोल करण्यात यश आले नाही. शेवटी 0-0 गोल हा सामना अनिर्णित राहिला.
ऑक्झिलियम कॉन्व्हेंट विरुध्द आर्मी पब्लिक स्कूल (एमआयसीएस) यांच्यातील सामना देखील शेवट पर्यंत गोल न झाल्याने 0-0 ने अनिर्णित राहिला.