दांडियाच्या तालावर थिरकल्या युवती व महिला
ग्रुप डान्समध्ये डानसिंग दिवास ठरला प्रथम
अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरात फ्युजन दांडिया 2023 सोहळा उत्साहात पार पडला. नवरात्र उत्सवाच्या प्रारंभीच हा सोहळा रंगला होता. यामध्ये महिला, युवती व ज्येष्ठ महिला देखील दांडियाच्या तालावर थिरकल्या.
पारंपारिक वेशभुषेतील सहाशेपेक्षा जास्त युवती-महिला आणि महिलांच्या विविध ग्रुपने यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मार्केटयार्ड जवळील सिताबन लॉन मध्ये झालेल्या या दांडिया कार्यक्रमात विविध स्पर्धा देखील पार पडल्या.

या कार्यक्रमासाठी छायाताई फिरोदिया, गीता गिल्डा, मनिषा गुगळे, वैशाली चोपडा, टायटल स्पॉन्सर शिगवी ज्वेलर्सच्या उज्वला शिंगवी, प्रेरणा शिगवी, को स्पॉन्सर राजेंद्र होम डेकोरच्या स्वाती लाहोटी, गुंदेचा शॉपीच्या भारती गुंदेचा, दांडिया ग्रुप कोअर कमिटीच्या डॉ. रश्मी अरडे, जागृती ओबेरॉय, अर्चना खंडेलवाल, अर्चना, चेतना मालू, दीप्ती गुंदेचा, सरस्वती अग्रवाल, सोना डागा, प्रणिता भंडारी, अर्पिता शिंगवी, दीप्ती सहानी आदींसह महिला मोठ्या संखेयेने उपस्थित होत्या.

दांडिया नृत्याच्या कार्यक्रमात महिला-युवतींचा उत्साह संचारला होता. नॉन स्टॉप म्युझिक लाईट, डीजेने रंगत आलेल्या दांडिया नाईटमध्ये पारंपारिक वेशभुषेत महिला व युवक-युवतींच्या ग्रुपने दांडिया नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. महिलांनी महिलांसाठी राबविलेल्या या उपक्रमात महिलांचा प्रतिसाद लक्षणीय होता.
ग्रुप डान्स मध्ये प्रथम- डानसिंग दिवास, द्वितीय- वर्मा ग्रुप, तृतीय-सारसनगर ग्रुप, स्पेशल परफॉर्मन्स जिजाऊ ग्रुपला मिळाले. या विजेत्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली यांनी केले. कार्यक्रमासाठी कोरियोग्राफी पलक गांधी यांनी केली. आभार फ्युजनच्या संचलिका शीतल गांधी यांनी केले.

