भिंगारच्या रोकडेश्वर हनुमान मंदिरात महाआरती; भगवान गौतम बुद्ध पुतळ्या समोर मेणबत्त्या प्रज्वलीत करुन प्रार्थना
प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी ईश्वराला साकडे
नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील श्री रोकडेश्वर हनुमान मंदिरात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने बुधवारी (दि.9 एप्रिल) पहाटे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी महाआरती करण्यात आली. तर जॉगिंग पार्क येथील भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्या समोर मेणबत्त्या प्रज्वलीत करुन अरुणकाकांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. प्रारंभी हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले.

याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, विठ्ठल (नाना) राहींज, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, इंजि. नागेश खुरपे, सुधीरशेठ कपाले, अभिजीत सपकाळ, सुरेखाताई आमले, राजश्री राहींज, प्रांजली सपकाळ, कमलाबाई पैठणकर, मालंदा हिंगणे, रिता दिक्षीत, नंदाताई गायकवाड, जयश्री शिंदे, विकास भिंगारदिवे, दिलीप गुगळे, अशोक पराते, सचिन चोपडा, अविनाश जाधव, प्रवीण दुराफे, रवी ताठे, राधेश्यामसिंग ठाकूर, चंद्रमणी दीक्षित, अनिल खताना, सरदारसिंग परदेशी, राजू कांबळे, सुभाष पेंढुरकर, रामनाथ गर्जे, शेषराव पालवे, विलास आहेर, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, कुमार धतुरे, अश्विन जामगावकर, विजूशेठ गांधी, राजू शेख, प्रदीप पिपाडा, प्रशांत चोपडा, राजू भिंगारे, ईवान सपकाळ, सदाशिव दळवी, प्रभाकर शर्मा, राहुल कदम, गणेश अस्मर, शशी शर्मा, संजय पतके, राजेंद्र चेंगेडिया, सिद्धू (तात्या) बेरड, किशोर लुल्ला, शिरीषराव वराडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, रोकडेश्वर हनुमान मंदिरात व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्या समोर अरुणकाकांना चांगले आरोग्य लाभावे आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्व नागरिकांनी मनोभावे प्रार्थना केली.
संजय सपकाळ म्हणाले की, अरुणकाका जगताप यांनी आपल्या कार्यातून सर्वांच्या मनात एक आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे. सर्वसामान्यांना आधार देवून त्यांनी अनेकांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. अरुणकाका बरे व्हावे, ही सर्व नगरकरांच्या मनातील इच्छा आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्व जाती-धर्माचे लोक प्रार्थना करत असून, अरुणकाका बरे होऊन सुखरूप शहरात परतण्यासाठी दैवी शक्तीला साकडे घालण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. विकास भिंगारदिवे यांनी अरुणकाकांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेऊन त्यांनी भिंगारकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगितले. ते आजारातून बरे व्हावे यासाठी सर्व भिंगारकर प्रार्थना करत असल्याचे, ते म्हणाले.